
Kanya Pujan in Navratri 2025
esakal
नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन कधी केले जाते.
या दिवसाला विशेष महत्त्व का आहे.
कन्यापूजन करण्याचे फायदे काय आहेत?
Why Kanya Pujan is done on Ashtami or Navami in Navratri: हिंदू धर्मात नवरात्री उत्सवाला खुप महत्व आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून हा उत्सव सुरू झाला आहे. या काळात देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते. हा सण शक्तीच्या अभ्यासाचे आणि देवीच्या उपासनेचे प्रतीक आहे. नवरात्री नवव्या दिवशी संपते आणि त्यापूर्वी, आठव्या आणि नवव्या दिवशी कन्या पूजनाची विशेष परंपरा पाळली जाते. शास्त्रांमध्ये देखील कन्या पूजन अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे म्हणून वर्णन केले आहे. पण कन्यापूजन अष्टमी किंवा नवमीलाच का केली जाते हे जाणून घेऊया.