
Marathi Bhasha Gaurav Din 2025: संपूर्ण महाराष्ट्रभर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा आहे. भारतातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे.
तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. दरवर्षी हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्याचा म्हणून साजरा केला जातो.