
यावर्षीची राखी ठरणार फारच खास; बहिणीसांठी भावांकडून होतेय गिफ्टची खास बुकिंग
रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस समजला जातो. या प्रेमाची तुलना कोणाशीच होवु शकात नाही, परंतु राजधानी लखनऊ मध्ये रक्षाबंधन साठी बहिणीला भेट देण्यासाठी तब्बल हजार स्कुटी बुक झाल्या आहेत.
भाऊ यावेळी राखी बांधण्यासोबत बहिणींना स्कूटी भेट देणार आहेत. रक्षाबंधनाच्या पंधरा दिवस अगोदरच 80 हजार ते 1.10 लाख किंमतीच्या स्कूटीचे आगोदर बुकिंग झाले आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राजधानीतील बाजारपेठा उजळू लागल्या आहेत. राखी खरेदी करण्या साठी बाजारपेठा गजबजल्या आहेत .
राख्या ३० टक्के महागल्या
या वर्षी राखीलाही महागाईचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सुती धागा, मोती, फेस आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे राख्या 30 टक्के महाग झाल्या आहेत. याहियागंज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमरनाथ मिश्रा यांनी सांगितले की, राख्यांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
चौक, चौपाटीया, नाखास या परिसरात दोन महिन्यांपूर्वीपासून लोक राख्या बनवत आहेत. लोक मोठ्या व्यापाऱ्यांकडून कच्चा माल घेऊन राख्या तयार करतात आणि पॅकिंग करतात. राजकोट, दिल्ली येथून लखनौला येथे विक्रीला येतात. येथून राख्या सीतापूर, बाराबंकी, अयोध्या जिल्ह्यात जातात.
हेही वाचा: Raksha bandhan 2022 date : यंदा रक्षाबंधन कधी? तारीख आणि तिथीमधील फरक जाणून घ्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वातंत्र्यदिनाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राखीच्या सणावरही त्याची छाप आहे. त्यामुळे तिरंग्याच्या, चांदीच्या राख्यांही बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री साठी आल्यात. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिन जवळपास असल्याने लोक त्या राखांना मोठी मागणी आहे.
Web Title: Year Rakhi Very Special Booking Gift Brother Sister
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..