Yogi Adityanath : आदित्यनाथ मंत्रिमंडळाने केले पवित्र स्नान; महाकुंभनगरीत कॅबिनेट बैठक; नव्या द्रुतगती मार्गांना मंजुरी
Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांचे मंत्रिमंडळ महाकुंभ नगरीत त्रिवेणी संगमावर अमृत स्नान आणि पूजाअर्चा केली. यावेळी नव्या द्रुतगती मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.
प्रयागराज : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील महाकुंभ नगरीमध्ये बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर योगी आदित्यानाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह त्रिवेणी संगमावर जाऊन अमृत स्नान केले.