५०० कोटींचा देशातील सर्वात महागडा गणपती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 September 2019

हिऱ्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या सुरतमधील एका व्यापाऱ्याने आपल्या घरी ५०० कोटींच्या हिऱ्याच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जी देशातील सर्वात महागडी मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबई : सोमवारपासून देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झाली असून, एकापेक्षा एक गणेशमूर्तींची चर्चा होत आहे. अशाच एका गणेश मूर्तीची सध्या देशभरात चर्चा होत आहे. हिऱ्यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या सुरतमधील एका व्यापाऱ्याने आपल्या घरी हिऱ्याच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. जी देशातील सर्वात महागडी मूर्ती असल्याचे सांगितले जात आहे. 

सुरतच्या कतारगाम भागात राहणारे हिऱ्याचे व्यापारी राजेश भाई पांडव यांनी या हिऱ्याच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ही मूर्ती २७.७४ कॅरेट हिऱ्यांपासून तयार करण्यात आली असून, तिची किंमत ५०० कोटी रुपये इतकी आहे. डायमंडचा गणपती या नावाने ही मूर्ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आला होता हिरा

२००५ मध्ये हुबेहूब गणपती सारखा दिसणारा हिरा दक्षिण आफ्रिकेतून व्यापारादरम्यान राजेश यांच्याकडे आला होता. राजेश यांनी विक्रीसाठी आलेला हा हिरा खरेदी केला. तेव्हापासून ते दरवर्षी या हिऱ्यांच्या गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The most expensive Ganpati in the country of 500 crore