अमिताभ चाहत्यांना म्हणाले, 'माझ्या जलसा बंगल्या बाहेर येऊ नका'

coronavirus impact bollywood amitabh bachchan evocation jalsa bungalow crowd
coronavirus impact bollywood amitabh bachchan evocation jalsa bungalow crowd

मुंबई Bollywood News : सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. सरकारने देशात शाळा, कॉलेज बंद केली आहे. गर्दी होईल, असे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, नागरिकांनाही गर्दीच्या ठिकाणी न जाण्याची विनंती करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा फटका बॉलिवूडलाही मोठ्या प्रमाणात बसलाय. अनेक सिनेमा, सिरिअल्सची शुटिंग बंद करण्यात आली आहेत. देशाबाहेर होणारी शुटिंगही बंद करण्यात आली आहेत.

आपल्या बिझी शेड्युलमधूनही चालू घडामोडींवर कायम भाष्य करणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोना व्हायरसची गंभीर दखल घेतली आहे. अमिताभ बच्चन भारतात असतील तेव्हा दर रविवारी त्यांच्या चाहत्यांना भेट देतात. त्यांच्या मुंबईतील जलसा या बंगल्याच्या चाहत्यांनी अक्षरशः जत्रा भरलेली असते. अमिताभ यांची एक झलक मिळावी, त्यांचा एक फोटो मिळावा. त्यांच्यासोबत एक सेल्फी काढता यावा, यासाठी चाहते गर्दी करतात. पण, कोरोना व्हायरसचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन, अमिताभ यांनी माझ्या बंगल्यासमोर येऊ नका, असं आवाहन चाहत्यांना केलंय. दर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही गर्दी जमते आणि अमिताभ बंगल्याच्या गेट जवळ येऊन चाहत्यांना अभिवादन करतात. आता कोरोनाच्या भीतमुळं हा प्रकार अनिश्चित काळासाठी थांबणार आहे. खुद्द अमिताभ यांनीच हे आवाहन केलंय. 

आणखी वाचा - 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसविषयी बातम्या येत आहेत. जलसा बंगल्यावर आज चाहत्यांना मी भेटणार नाही. तुम्ही कोणीही या ठिकाणी एकत्र येऊ नका. तुम्ही सुरक्षित राहा. 
- अमिताभ बच्चन

कोरोनामुळे सध्या जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारततही कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. दरम्यान, प्रशासनाने जमाव बंदी लागू केला आहे. आमिताभ बच्चन यांनी ट्विट करून, चाहत्यांना जलसा बाहेर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे हे ट्विट काही तासात व्हायरल झाले असून त्यावर चाहत्याच्या भरपूर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. आमिताभ यांनी कोरोनावर हिंदीमध्ये एक कविता तयार केली असून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा - 

अशी आहे अमिताभ बच्चन यांची कोरोनावरील कविता
“बहुतेरे इलाज बतावें ,जन जनमानस सब ,
केकर सुनैं, केकर नाहीं, कौन बताए इ सब ;
केयु कहिस कलौंजी पीसौ, केयु आँवला रस
केयु कहस घर  म बैठो, हिलो न ठस से मस 
ईर कहेन औ बीर कहेन, की ऐसा कुछ भी Carona ,
बिन साबुन से हाथ धोई के ,केहू के भैया छुओ न ;
हम कहा चलो हमौ कर देत हैं , जैसन बोलैं सब
आवय देयो , Carona-फिरोना , ठेंगुआ दिखाऊब तब !" 
~ अब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com