esakal | डान्सिंग अंकल इज बॅक; खैके पान बनारस वाला (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Dancing uncle Sanjeev Shrivastava is back with Khaike Paan Banaras Wala

अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि 'सुपर' या शब्दामध्ये श्रीवास्तव यांची प्रशंसा केली.

डान्सिंग अंकल इज बॅक; खैके पान बनारस वाला (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः डान्सिंग अंकल अशी ओळख निर्माण करणारे संजीव श्रीवास्तव ऊर्फ डब्बू काका यांनी 'खैके पान बनारस वाला' या गाण्यावर नृत्य केले असून, पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन यांची दाद मिळाली आहे.

बिग बींच्या 'खैके पान बनारस वाला...' या गाण्यावर डान्सिंग अंकलने नृत्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताना त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही टॅग केला आहे. श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, 'फार हिंमत करून तुमच्या गाण्यावर नृत्य केले आहे, कृपया हा व्हिडिओ पाहा.' अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि 'सुपर' या शब्दामध्ये श्रीवास्तव यांची प्रशंसा केली. यामुळे डान्सिंग अंकल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वी डब्बू काका यांनी 'आप के आ जाने से...' या गाण्यावर नृत्य केले होते. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रातोरात ते चर्चेत आले होते. सोशल मीडियावर 'डब्बू काका' या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली. शिवाय, कलाविश्वालाही त्यांनी आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. यानंतर त्यांना एक जाहिरातसुद्धा मिळाली होती.

loading image
go to top