मोदी राज्यात हाफ गर्लफ्रेंडवर का आली बंदी?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 August 2019

चेतन भगत यांच्या पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या हाल्फ गर्लफ्रेंड या पुस्तकातून चूकीचा संदेश दिला जात असल्याचे सांगत रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे या पुस्तकावर रेल्वे स्टेशनवरील स्टॅाल्सवर विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

नवी दिल्ली : मोदींच्या राज्यात दररोज एकावे ते नवलच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक हाल्फ गर्लफ्रेंडमधून चूकीचा संदेश दिला जात असल्याचा शोध रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या अध्यक्ष महोदयांनी लावला असून या पुस्तकाला रेल्वे स्टेशनवरील स्टॅाल्सवर विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या पुस्तकाला प्रकाशित होऊन पाच वर्ष तर झालीच आहेत तसेच त्यावर एक बॅालिवुड सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. मात्र यासर्वानंतर आता रेल्वे सेवा समितीला हे पुस्तक अश्लिल आणि चूकीचा संदेश देत असल्याचे वाटत आहे. दरम्यान या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोदी सरकार व रेल्वे प्रवासी सेवा समिती अध्यक्षांच्या निषेधार्थ पोस्टस् व्हायरल होत आहेत. 

संबधित निर्णय रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष रमेश चंद्रा यांनी रेल्वे स्टेशन आवाराच्या पाहणी दरम्यान घेतला आहे. काही दिवसांपूर्वी रमेश चंद्रा हे नवी दिल्ली रेल्वे स्थानकाची पाहणी करत असताना एका पुस्तक विक्री स्टॅालवर पोहोचले त्यावेळी त्यांना हाल्फ गर्लफ्रेंड हे पुस्तक विक्रीस आढळून आले. त्यावेळी त्यांनी संतप्त पणे ते पुस्तक तेथील पुस्तक विक्रेत्याला हटविण्यास सांगितले व इतर सर्व रेल्वे स्थानकावरील त्या पुस्तकाची विक्री देखील थांबवण्यास सांगितली.

रमेश यांच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्यासह सरकारवर देखील निशाना साधला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half Girlfriend book banned at railway stations