सीतारामन यांच्या वक्तव्याची शोभा डे ट्विटरवर उडवताय खिल्ली

टीम ई-सकाळ
Tuesday, 17 September 2019

देशात आर्थिक मंदीची परिस्थिती असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. त्यांच्यावर अनेक मिम्स क्रिएट केले जात आहे आणि ते धडाधड फॉरवर्डही होत आहेत. यात प्रख्यात पत्रकार आणि लेखिका शोभा डेदेखील मागे नाहीत.

मुंबई : देशात आर्थिक मंदीची परिस्थिती असल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. त्यांच्यावर अनेक मिम्स क्रिएट केले जात आहे आणि ते धडाधड फॉरवर्डही होत आहेत. यात प्रख्यात पत्रकार आणि लेखिका शोभा डेदेखील मागे नाहीत. त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर टीका केली असून, त्यावरून यूजर्सनी शोभा डे यांनाही लक्ष्य केलंय.

राजस्थानमध्ये मायवतींना झटका; आमदारांनी घेतला परस्पर निर्णय

मिम्स केले शेअर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीवर एक वक्तव्य केले होते. देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राला ओला आणि उबर सेवेमुळे मंदीला सामोरं जावं लागतंय, असं त्या म्हणाल्या होत्या. नागरिक कार खरेदी करण्याऐवजी या सेवेचा लाभ घेत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अर्थात त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवण्यात येत आहे. यावरून त्याचे मिम्सही तयार करण्यात येत आहेत. ज्येष्ठ पत्रकार शोभा डे यांनी त्यांचे त्यातले काही मिम्स शेअर केले आहेत. त्यावर उलट-सुलट चर्चा होत आहेत.

आता उर्मिला मातोंडकर करणार ‘या’ पक्षात प्रवेश?

अमित शहांवर निशाणा
शोभा डे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदी दिनाच्या ट्विट संदर्भातही एक पोस्ट केली असून, मातृभाषेचा सन्मान करावा, असेही म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: writer shobha de twitter post about finance minister nirmala sitharaman