राजस्थानमध्ये मायावतींना झटका; आमदारांनी घेतला परस्पर मोठा निर्णय

राजस्थानमध्ये मायावतींना झटका; आमदारांनी घेतला परस्पर मोठा निर्णय

जयपूर : लोकसभा निवडणुकीत बसप आणि समाजवादी पक्षाच्या महागठबंधनमध्ये काँग्रेसचा सामावेश न करण्याची आडमुठी भूमिका घेतलेल्या मायावती यांनी राजस्थानमध्ये मोठा झटका बसला आहे. त्यांच्या आमदारांनी राजस्थानातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मायावती यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा अध्यक्षांना पत्र
राजस्थानमध्ये मायावतींच्या बसपचे सहा आमदार आहेत. त्यात राजेंद्रसिंह गुधा, जोगेंद्रसिंह अन्वा, वाजिब अली, लखनसिंह मीना, संदीप यादव आणि दीपचंद्र यांचा समावेश आहे. या सहाही जणांनी काल (सोमवार १६ सप्टेंबर) मध्यरात्री विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. या पत्रात सहाही जणांसह विधीमंडळ पक्ष सत्ताधारी काँग्रेसमध्ये करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात एका काँग्रेस नेत्याने माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून हे सहाही आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपर्कात होते. आता त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करून बसपला धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आमदारांनी मायवतींच्या परस्पर हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात राजेंद्र गुड्ड यांनी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘जातीयवादी शक्तींशी लढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही विकासासाठी आणि राज्य सरकारच्या स्थैर्यासाठी काम करत आहोत. अशोक गेहलोत हे उत्तम मुख्यमंत्री आहेत. त्यांची नम्रता आणि कामाच्या पद्धतीने आम्ही प्रभावित झालो आहोत.’

बाहेरून पाठिंबा अशक्य
राज्यात काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्यात अडचणी येत होत्या, असे सांगून जोगेंद्रसिंह अन्वा म्हणाले, ‘आम्ही राज्याच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. एकाबाजुला आम्ही राज्यात काँग्रेसला पाठिंबा देत आहोत तर, दुसऱ्या बाजूला आम्ही निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढत होतो. हे खूप अवघड जात होतं. त्यामुळंच आम्ही विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत.’ राजस्थान विधानसभेच्या २०० जागा आहेत. त्यात काँग्रेसकडे १०० जागा असून, १३ पैकी १२ अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. राष्ट्रीय लोक दलाचा एक आमदारही काँग्रेस सोबत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com