esakal | पाठ सोडतच नाही! कोरोनामुक्तांना करावा लागतोय मेंदू आणि मानसिक आजारांचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Mental_Health

१७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली.

पाठ सोडतच नाही! कोरोनामुक्तांना करावा लागतोय मेंदू आणि मानसिक आजारांचा सामना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. कोरोना रुग्णांबाबत केलेल्या एका सर्व्हेनंतर तुमची झोप उडवणारी माहिती पुढे आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या न्युरॉलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याचा या सर्व्हेतून अभ्यास करण्यात आला. कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांत तीनपैकी एका रुग्णाला न्युरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले. 

लॅन्सेट सायकायट्री जर्नलमध्ये याबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोनामुक्त झालेल्या २,३०,००० हून अधिक लोकांच्या आरोग्याच्या नोंदी घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ टक्के लोकांना ६ महिन्यांत न्युरॉलॉजिकल किंवा मानसिक समस्यांनी ग्रासले होते. 

Corona: रुग्णांसाठी बेडचा ‘मुंबई पॅटर्न’ राज्यभर; मुख्य सचिवांनी दिली माहिती​

१७ टक्के लोक अत्यंत चिंताग्रस्त, तर १४ टक्के लोकांमध्ये मूड डिसऑर्डरबाबतची लक्षणे आढळून आली. मनोविकाराशी कोरोनाचा काय संबंध आहे याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती मिळालेली नाही, पण कोरोनामुक्त झालेल्या लोकांमध्ये चिंता आणि नैराश्य या दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून आल्या, असे संशोधकांनी स्पष्ट केले. 

तसेच या सर्व लोकांमध्ये स्ट्रोक, स्मृतिभ्रंश आणि न्युरॉलॉजिकल डिसऑर्डर यांसारखी लक्षणेदेखील आढळली, पण याचं प्रमाण कमी आहे. कोरोना संबंधीचे हे संशोधन खूप महत्त्वाचे मानले जात आहे. सर्व्हे करण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतांश हे अमेरिकी होते. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image