Hepatitis : 'हेपटायटीस'च्या संसर्गामुळे दररोज 3,500 लोकांचा मृत्यू, सर्वात धोकादायक 10 देशांमध्ये भारताचा समावेश; WHO चा इशारा

Hepatitis : कोरोना महामारीतून जग सावरत असताना हेपटायटीसने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. व्हायरल हेपटायटीस हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण बनले आहे.
Hepatitis
HepatitisEsakal

कोरोना महामारीतून जग सावरत असताना हेपटायटीसने जगाची डोकेदुखी वाढवली आहे. व्हायरल हेपटायटीस हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2024 च्या जागतिक हेपटायटीस अहवालानुसार, 2022 मध्ये 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे.

डब्ल्यूएचओच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, व्हायरल हेपटायटीसमुळे मृत्यू झालेल्यांची अंदाजे संख्या 2019 मध्ये 1.1 दशलक्ष वरून 2022 मध्ये 1.3 दशलक्ष झाली आहे. यापैकी 83 टक्के हेपटायटीस बी आणि 17 टक्के हेपटायटीस सी मुळे होते. यामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू होत आहे.

Hepatitis
Stress Relief Foods : ताण-तणावापासून सुटका हवीय? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी सांगितले की, हेपटायटीस संसर्गामुळे मृत्यूची संख्या वाढत आहे. हा रोग दरवर्षी जगभरात 1.3 दशलक्ष लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. हे क्षयरोग सारख्या रोगाच्या समान श्रेणीमध्ये येते, जे बहुतेक संसर्गजन्य मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण मानले जाते.

'WHO 2024 ग्लोबल हेपटायटीस रिपोर्ट' मध्ये म्हटले आहे की, 187 देशांमधील नवीन डेटा दर्शविते की, व्हायरल हेपटायटीसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2019 मध्ये 11 लाखांवरून 2022 मध्ये 13 लाखांपर्यंत वाढला आहे. यापैकी ८३ टक्के मृत्यू हेपटायटीस बी आणि १७ टक्के मृत्यू हेपेटायटीस सी मुळे झाले आहेत. हिपॅटायटीस बी आणि सी संसर्गामुळे जगभरात दररोज 3,500 लोकांचा मृत्यू होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Hepatitis
Summer Care : उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना गॉगल आणि हेल्मेटचा करा वापर

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीचे डायरेक्टर-जनरल डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, हेपटायटीस संसर्ग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रगती झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या अजूनही वाढत आहे. हेपटायटीस असणा-या फार कमी लोकांचे निदान आणि उपचार केले जात आहेत.

या अहवालात म्हटले आहे की, निदान आणि उपचारासाठी आता चांगली उपकरणे उपलब्ध झाली आहेत आणि त्यांच्या किमतीही कमी होत आहेत. परंतु चाचणी आणि उपचार कव्हरेज दर वाढलेले नाहीत. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, जागतिक आरोग्य संस्था सर्व देशांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

2019 च्या तुलनेत नवीन प्रकरणांमध्ये किंचित घट झाली असली तरी, विषाणूजन्य हेपटायटीसचे एकूण प्रमाण जास्त आहे. 2022 मध्ये, 2.2 दशलक्ष नवीन संक्रमण झाले, जे 2019 मध्ये 2.5 दशलक्ष होते. यामध्ये 1.2 दशलक्ष नवीन हेपटायटीस बी संसर्ग आणि जवळपास 1 दशलक्ष नवीन हेपटायटीस सी संक्रमणांचा समावेश आहे. दररोज 6000 हून अधिक लोकांना व्हायरल हेपटायटीसचे नवीन संसर्ग होत आहे.

Hepatitis
Benefits of Uttanasana : डोकेदुखी आणि निद्रानाशच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासन, मिळतील आश्चर्यकारक फायदे

बांगलादेश, चीन, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स, रशियन फेडरेशन आणि व्हिएतनाम या देशांमध्ये एकत्रितपणे हेपटायटीस बी आणि सीच्या दोन तृतीयांश संक्रमणे आहेत.

परवडणारी जेनेरिक व्हायरल हेपटायटीस औषधे उपलब्ध असूनही, अनेक देश या कमी किमतीत त्यांची खरेदी करण्यात अपयशी ठरतात, असे आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

Hepatitis
Cancer Capital Of The World: 'चिंताजनक! भारत जगातील कर्करोगाची राजधानी, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com