आज जागतिक दूध दिवस: जाणून घ्या A2 दूधाचे अविश्वसनीय फायदे

आज जागतिक दूध दिवस: जाणून घ्या A2 दूधाचे अविश्वसनीय फायदे
Updated on

नवी दिल्ली- आज जागतिक दूध दिवस आहे. दूधाचं महत्व आपणा सर्वांना माहित आहे. आई किंवा आजीने लहानपणी आपल्या मागे दूध पिण्यासाठी तकादा लावल्याचं तुम्हाला आठवत असेल. दूधाचं भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील महत्व अनन्यसाधारण आहे. सकाळी उठल्यावर चहा किंवा दूध पिणं आपल्या सवयीचा भाग झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात वर्षाला 175 बिलियन लिटर दूध उत्पादीत होते. तसेच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादित करणारा देश आहे. 

1 जून हा दरवर्षी जागतिक दूध दिवस म्हणून पाळला जातो. 2001 साली अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेने 1 जून हा जागतिक दूध दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली. त्यामुळे जगभरात दूधाचे महत्व अधोरेखीत झाले. दूध हे महत्वाचे खनिज असून दात आणि हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. याशिवाय दूधात अनेक पोषकतत्वे असतात. 

दूधाचे A1 दूध आणि A2 दूध अशा दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. जे दूध पश्चिमी देशांमधील गायींपासून उत्पादीत होते त्याला A1 दूध म्हणतात. उदा. जर्सी, होलेस्टिन फ्राईसिन अशा गायींपासून मिळणारे दूध. तर जे दूध भारतीय मुळ असलेल्या गायींपासून उत्पादित होते त्याला A2 दूध म्हणतात. उदा. गीर, साहिवाल. भारतीय मुळ असलेल्या गायी पश्चिमी देशातील गायींपेक्षा कमी दूध देतात. तसेच A1 आणि A2 गायींमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये फरक आढळतो. 

A2 दूधच का?

A2 दूध हे शुद्ध स्वरुपातील आणि प्रथिनांनी भरपूर असते. A2 गायींना नैसर्गिक अन्न आणि पाणी दिले जाते. त्यामुळे त्यांच्या दूधामध्ये कोणताही फरक आढळत नाही. तसेत A2 गायींच्या दूध काढण्याची पद्धतही पारंपरिक आहे. A2 गायी A1 गायींपेक्षा कमी दूध देतात. त्यामुळे A1 दूध सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे देशातील अनेक भागात A1 गायींचेच दूध विकत मिळते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

A2 दूधाचे फायदे

A2 दूधाचा सर्वात पहिला फायदा म्हणजे दूध सर्वाधिक आरोग्यकारक आणि शुद्ध आहे. A2 दूध पचवण्यासाठी देखील चांगलं आहे. A2 दूधाची तुलना ही आईच्या दूधाशी केली जाते. कारण या दूधात आईच्या दूधात आढळणारे जवळपास सर्वच गुणधर्म आढळतात. जर तुम्हाला तुमचे शरीर मजबूत आणि ताकदवान बनवायचं असेल तर A2 दूध उपयुक्त ठरते. एक ग्लास दूधातून 8 ग्रॅम प्रथिने मिळतात. जे तुम्हाला कृत्रीम पेयामधून कधीही मिळणार नाही.  

दूधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. दूधात 9 प्रकारची पोषण तत्वे असतात. जिवनसत्व A, B, B12 आणि पोटॅशिअम, फॉस्फरस, पॅनथोनिक आम्ल, नायेसिन आणि रायबोफोविन इत्यादी शरिरासाठी आवश्यक तत्वे असतात. तसेच दूध हे अॅटिबायोटिक आहे

A2 दूध हे इतर प्रकारच्या दूधांपेक्षा महाग असते. पण या दूधामुळे अविश्वसनीय फायदे होऊ शकतात. तसेच दवाखाण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा A2 दूधासाठी थोडे जास्त पैसे दिलेले तुम्हाला केव्हाही परवडणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com