Aadhaar Card : देशभरात १ लाख २५ हजार बनावट आधारकार्ड रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhaar Card

Aadhaar Card : देशभरात १ लाख २५ हजार बनावट आधारकार्ड रद्द

औरंगाबाद : आधार कार्ड आता कोणत्याही शासकीय कामासाठी, ओळखीसाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात आहे. त्यातच सन २०१९ पासून तर २९ जुलै २०२२ पर्यंत देशभरात १ लाख २५ हजार ४५४ बनावट आधार कार्ड केले गेले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ हजार ७८८ आधार कार्डाचा समावेश आहे.सन २०१९ पासून तर आतापर्यंत देशात सर्वाधिक २० हजार ६९६ आधारकार्ड आंध्रप्रदेशात रद्द करण्यात आले आहे. त्या खालोखाल मध्यप्रदेश १३ हजार ८३, कर्नाटक १२ हजार ५५२, बिहार १० हजार ७२२, उत्तर प्रदेश १० हजार ५९०, महाराष्ट्र ९ हजार ७८८ कार्डाचा यात समावेश आहे.

एखादे आधार कार्ड बनावट आहे की नाही याची माहिती आधारच्या बेवसाईटवर आधार क्रमांक टाकून ऑनलाइन बघितली जाऊ सकते. तसेच आधारवरील क्यु आर कोड स्कॅन करून, बायोमेट्रीक्स, ओटीपीच्या माध्यमातून ही आधार बनावट आहे की नाही याची माहिती घेता येते.

देशात सर्वाधिक आधार कार्ड रद्द केलेल्या राज्यांची संख्या

आंधप्रदेश- २०६९६

बिहार- १०७२२

छत्तीसगड- २९४०

दिल्ली- ५३८५

गुजरात- ४३४३

हरियाना- ३१३५

झारखंड- ७९६३

कर्नाटक- १२५५२

मध्यप्रदेश-१३०८३

महाराष्ट्र- ९७८८

ओडिसी- ३६६१

पंजाब- २६७१

राजस्थान- ४३१३

तमिळनाडू- २६१९

तेलंगना- ३०२५

उत्तरप्रदेश- १०५९०

पश्‍चिम बंगाल- ४५९१

केरळ- १०७६

हिमाचल प्रदेश- ५९१

गोवा- ७४