जामियातील आंदोलनप्रकरणी 10 जणांना अटक, पण विद्यार्थी नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) दहा जणांना अटक केली. पण, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जामिया मिलिया विद्यापीठाबाहेर झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (मंगळवार) दहा जणांना अटक केली. पण, अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जामिया मिलिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्याला हिंसाचाराचे गालबोट लागले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत पोलिसांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या गुंडगिरीविरोधात सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.

तणावाच्या पार्श्‍वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या या भूमिकेचे दिल्लीत तीव्र पडसाद उमटले आहेत. विद्यापीठाने पाच जानेवारीपर्यंत हिवाळी सुटी झाल्याने परीक्षादेखील स्थगित केल्या आहेत. 

पाणी योजनांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणतात पहा

जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहेत. या कारवाईची न्यायालयीन चौकशी व्हावी, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून वादग्रस्त कायदा मागे घ्यावा, अशी मागणी करताना विरोधकांनी गृहमंत्री अमित शहा गप्प का आहेत, असा सवाल विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, वादग्रस्त कायद्याविरुद्ध राष्ट्रपतींकडे दाद मागण्याचीही घोषणा विरोधी पक्षांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आज गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या दहा जणांना अटक केली आहे. यामध्ये एकही विद्यार्थ्याचा समावेश नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 arrested for protesting in Jamia but no student