

10 Kg LPG Cylinder
esakal
BPCL LPG Cylinder: देशातील २४ राज्यांमधील १०० शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी तेल कंपनीने या शहरांमध्ये १० किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी होईल.