10 वर्षांच्या मुलाने 30 सेकंदात लांबवले 10 लाख रुपये...

वृत्तसंस्था
Thursday, 16 July 2020

एका दहा वर्षाच्या मुलाने अवघ्या 30 सेंकदामध्ये बॅंकेतून 10 लाख रुपये लांबविल्याची घटना येथे घडली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

निमच (मध्य प्रदेश) : एका दहा वर्षाच्या मुलाने अवघ्या 30 सेंकदामध्ये बॅंकेतून 10 लाख रुपये लांबविल्याची घटना येथे घडली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आयएएस अधिकाऱयाची गुणपत्रिका पाहाच...

निमच जिल्ह्यातील जवाद परिसरातील एका बँकेत घडली. बॅंकेच्या सीसीटीव्हीमध्ये चोरी दिसत आहे. संबंधित मुलाने सकाळी 11 च्या सुमारास बॅंकेत प्रवेश केला. यावेळी बॅंकेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. मुलगा बॅंकेत आल्याचे कोणी पाहिले नाही. उंची लहान असल्यामुळे तो टेबल खाली जाऊन बसला, यावेळी बॅंकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या एका महिलेने काउंटरवर पैसे ठेवले होते. टेबला खाली लपलेल्या या 10 वर्षीय मुलाने हळूच 10 लाखांचे बंडल बॅगेत टाकले आणि बॅंकेतून निघून गेला. हा सर्व प्रकार अवघ्या 30 सेकंदात घडला आहे.

मृतदेहाचा फोटो काढायला गेले अन्...

बॅंकेच्या अधिकाऱ्यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तत्कार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर चोरी दिसून आली. मुलांची उंची कमी असल्यामुळं तो टेबलखाली लपल्याचे कॅमेऱ्यातही दिसत नाही. शिवाय, ग्राहकांची गर्दी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही हा मुलगा दिसला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण, हा मुलगा एकटा नसून, त्याच्या मदतीली एक तरुणही बॅंकेबाहेर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 year old boy steals 10 lakhs from bank only 30 at madhya pradesh