Crime
Crimeesakal

10th Student : लग्न रद्द झाल्याच्या रागातून दहावीच्या विद्यार्थिनीचे चाकूने डोके छाटून, शरीराचे तुकडे करुन निर्घृण खून

अल्पवयीन मुलगी सुरलब्बी सरकारी हायस्कूलमध्ये (Govt High School) शिकत होती.
Summary

ओंकारप्पासोबत तिचा साखरपुडा गुरुवारीच होणार होता. ती अल्पवयीन असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

बंगळूर : कमी वयाच्या कारणावरून निश्चित झालेला विवाह (Marriage) रद्द झाल्याच्या रागात भावी पतीने दहावीच्या विद्यार्थिनीचे (10th Student) डोके छाटून तिचा निर्घृण खून केल्याची घटना कोडगू जिल्ह्यातील सोमवारपेठ तालुक्यातील सुरलब्बी येथे घडली. संशयित आरोपी प्रकाश ओंकारप्पा (वय ३५) याने आत्महत्या केली.

Crime
Whale Fish Vomit : तब्बल पाच किलो 70 ग्रॅमची व्हेल माशाची उलटी जप्त; मालवण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलगी सुरलब्बी सरकारी हायस्कूलमध्ये (Govt High School) शिकत होती. ती गुरुवारी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे तिचे पालक आनंदात होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आरोपी ओंकारप्पा संध्याकाळी तिच्या घरी आला. आई-वडिलांसमोरूनच तिला ओढून निर्जनस्थळी नेले. चाकूने तिचे डोके कापले. तिच्या शरीराचे तुकडे केले आणि तो पसार झाला.

Crime
Women Abuse Case : प्रज्वल रेवण्णाविरुद्ध बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल; खासदाराच्या अडचणी वाढल्या

ओंकारप्पासोबत तिचा साखरपुडा गुरुवारीच होणार होता. ती अल्पवयीन असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करता येणार असल्याची माहिती दिली. पोलिसांनी साखरपुडा थांबवला. त्यानंतर दोन्ही कुटुंबे आपापल्या घरी गेली. मात्र रागाच्या भरात आरोपींने मुलीची हत्या केल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com