Chiplun Police : 'त्या' बांगलादेशींचे देशात 10 वर्षे वास्तव्य; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू, महत्त्वाचे धागेदोरे हाती लागणार?

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मदतीने तपास केला जात आहे.
Bangladeshi Infiltrators Chiplun Police
Bangladeshi Infiltrators Chiplun Policeesakal
Summary

या तिघांना रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते.

चिपळूण : बांगलादेशातून (Bangladesh) भारतात अवैधरित्या घुसखोरी केलेल्या तिघांना चिपळूण पोलिसांनी (Chiplun Police) खेर्डी येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे देखील हे कुटुंब वास्तव्याला होते. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) मदतीने तपास केला जात आहे.

हे कुटुंब भारतात गेल्या १० वर्षांपासून वास्तव्याला आहे. त्यांच्या कुटुंबात ११ सदस्यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी खेर्डी येथून गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) या तिघांना रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले होते.

Bangladeshi Infiltrators Chiplun Police
Satara : मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शंभूराज देसाईंबाबत जनतेत नाराजी; पालकमंत्री बदलाची चर्चा, पदासाठी अजितदादा गट आग्रही

त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची चिपळूण पोलिसांनी कसून चौकशी केली असतानाच ते खेर्डी येथे राहण्यापूर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दोन अडीच वर्षे वास्तव्याला होते. त्यानंतर खेर्डी मोहल्ला येथे गेल्या आठ वर्षांपासून ते वास्तव्याला आहेत. तीन खोल्यांमध्ये हे कुटुंब वास्तव्य करीत आहे.

Bangladeshi Infiltrators Chiplun Police
धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

त्यांच्या कुटुंबात महिला व मुलांसह ११ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून १५ हजार रुपये रोकड, प्रत्येकी ५ हजार रुपये किमतीचे मोबाईल, आधार कार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र जप्त केले आहे. त्यांच्याकडील या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

Bangladeshi Infiltrators Chiplun Police
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

कोणत्या मार्गाने घुसखोरी

मुल्ला कुटुंब खेर्डी येथे बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंगची कामे करतात. संपुर्ण कुटुंब या कामात आहेत. नवी मुंबई येथे देखील हेच काम ते करत होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांच्या पथकाने कोपरखैरणेसह मुंबई क्षेत्रात संबंधित कुटुंबापैकी कोणावर गुन्हा अथवा तक्रार दाखल आहे का, तसेच ते कोणत्या मार्गाने भारतात आले, घुसखोरी कशा पद्धतीने केली. अशा अनेक प्रश्नांचा उलगडा केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com