धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

मोदींच्या नेतृत्वाखाली महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे.
BJP leader Chandrashekhar Bawankule
BJP leader Chandrashekhar Bawankuleesakal
Summary

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा इचलकरंजीचा पहिलाच दौरा होता. या निमित्ताने भाजपच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

इचलकरंजी : ‘हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना मान्य आहे काय?, तुमच्यात धमक असेल तर ही आघाडी तोडा, नाहीतर जनताच तुमचा बदला घेईल’, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

हातकणंगले लोकसभा प्रवास अंतर्गत आज येथे ‘संपर्क ते समर्थन’ अभियान पार पडले. त्याचा समारोप महात्मा गांधी पुतळा चौकात झाला. यावेळी ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नरेंद्र मोदी हे सर्व रेकार्ड तोडून पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

BJP leader Chandrashekhar Bawankule
Loksabha Election : 'या' दोन मतदारसंघाबाबत राणेंचं मोठं विधान; शिंदे गटाची गोची? म्हणाले, उमेदवारी कोणाला द्यायची हे..

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर, अशोक माने, अशोक स्वामी, डॉ. संजय पाटील, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शहराध्यक्ष अमृत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

बावनकुळे म्हणाले, ‘आजच्या अभियानामध्ये ९३४ जणांना भेटलो. त्यातील ९३२ जणांनी मोदींना समर्थन दिले. तर एकाने राहुल गांधींचे आणि दुसऱ्याने प्रकाश आंबेडकर यांना समर्थन दर्शविले. त्यामुळे ९८ टक्के नागरिकांना पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान व्हावेत, असे वाटते. मोदींच्या नेतृत्वाखाली महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे. आरक्षण दिल्यामुळे आता लोकसभेत आणि विधानसभेतही महिला शक्ती दिसणार आहे.’

BJP leader Chandrashekhar Bawankule
Sulkud Water Scheme : आधी वादग्रस्त विधान, पण आता मुश्रीफांना इचलकरंजीबाबत घ्यावं लागणार नमतं; काय आहे कारण?

ते पुढे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होवू नयेत, यासाठी शरद पवार व उध्दव ठाकरे यांनी षड्‍यंत्र केले. पण काळानेच त्यांचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी सत्तेला लाथ मारत हिंदुत्व व शिवसेनेचे पतन थांबविण्यासाठी धाडसी निर्णय घेतला. आता अजित पवार यांचेही मोदी यांना समर्थन मिळाले आहे.’

BJP leader Chandrashekhar Bawankule
Karad Politics : लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल; माजी आमदाराचं सूचक वक्तव्य, भाजपवासी होण्याची शक्यता

प्रारंभी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व महात्मा गांधी पुतळा येथे बावनकुळे यांनी पुष्पहार अर्पण केला. अग्रसेन भवन येथे पक्षाचे निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. तर संवाद ते समर्थन अभियानास मलाबादे चौकातून प्रारंभ केला. यावेळी धनगरी ढोल, झांजपथक व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्वागत केले.

BJP leader Chandrashekhar Bawankule
Satara : मुख्यमंत्र्यांचे विश्वासू शंभूराज देसाईंबाबत जनतेत नाराजी; पालकमंत्री बदलाची चर्चा, पदासाठी अजितदादा गट आग्रही

भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा इचलकरंजीचा पहिलाच दौरा होता. या निमित्ताने भाजपच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. शहरातील वर्दळ असलेल्या मुख्य मार्गावर भाजपमय वातावरण झाले होते. तर महिलांचा सहभाग मोठा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com