आमदार निवासातून 11 मोबाईल फोन जप्त

पीटीआय
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

जम्मू काश्‍मीरमधून 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

श्रीनगर : श्रीनगरच्या आमदार निवासात राहणाऱ्या नेत्यांकडून सुमारे 11 मोबाईल फोन संच जप्त केल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

जम्मू काश्‍मीरमधून 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांना आमदार निवासात ठेवण्यात आले आहे. एम. ए. मार्गावर असलेल्या आमदार निवासाला उपकारागृहाचा दर्जा दिला असून, त्यानुसार तेथे नियम आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून आमदार निवासाची नियमित तपासणी होत असताना तेथे मोबाईल फोनचा वापर होत असल्याची माहिती मिळाली होती. तुरुंगाच्या नियमानुसार आमदार निवासाची काल सायंकाळी झडती घेतली. त्यात अकरा मोबाईल फोन संच जप्त करण्यात आले.

मी पुन्हा आलो; पण एवढ्या सकाळी सकाळी... 

पोलिसांनी आमदार निवासातील खोलींची तपासणी केली असता मोबाईल फोन आढळून आले. 5 ऑगस्टनंतर 35 हून अधिक नेते नजरकैदेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 mobile phones seized from MLA residence in srinagar