
स्पाइसजेटच्या विमानाचा लँडिगदरम्यान अपघात; 40 जखमी, तर 12 जण गंभीर
मुंबई : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे स्पाईसजेटचे विमानाला लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात किमान ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील काझी नजरुल इस्लाम विमानतळावर स्पाइसजेटचे विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत विमानातील ४० प्रवाशांपैकी किमान १२ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाअपघात कसा झाला याचा तपास करण्यात येत आहे, दरम्यान १२ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लँडिंग करत असताना विमानाच्या केबिनमधील सामान प्रवाशांच्या अंगावर पडले, त्यामुळे अनेकांना डोक्याला जखमा झाल्या. दरम्यान अधिकृत निवेदनात, स्पाईसजेटने सांगितले की, मुंबई ते दुर्गापूरला जाणारे बोईंग B737 विमान SG-945 हे विमान लँडिंग करताना गंभीर धोका पत्करला, ज्यामुळे दुर्दैवाने काही प्रवाशांना दुखापत झाली. स्पाइसजेटने या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे सांगितले आहे.