
राज ठाकरेंवर नाना पटोलेंची टीका, म्हणाले; 'महाराष्ट्राचा तमाशा.. .'
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी सरकारला ४ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्याचा नवा अल्टिमेटम दिला आहे. तर त्यांनी या सभेत राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका देखील केली आहे. ठाकरे यांच्या सभेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यातच कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, आपण पाहिल असेल तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सुपारीबाज म्हटल त्याच प्रकारचं भाषण आज झालं आहे. जनतेच्या मुळ प्रश्नावर बोलतील अशा लोकांच्या अपेक्षा होत्या ते बोलू शकले नाहीत, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबत कारवाई झाली आहे
त्यामुळे त्यांचा निर्वाणीचा इशारा कमी पडणार नाही, महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे तो थांबवावा, हा वाद बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हे चांगले नाही असे देखील पटोले यांनी यावेळी सांगितले .