Omicron : विदेशातून दिल्लीत आलेल्या 12 जणांना कोरोना

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविले नमुने
britain airport
britain airportFile Photo

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रोनचे (Corona New Variant) दोन रूग्ण कर्नाटकात (Karnataka) आढळून आल्यानंतर संपूर्ण देशाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी दिल्लीत आंतरराष्ट्रीय (Delhi Airport )प्रवास करून आलेल्या 12 संशयित रूग्णांना दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश रूग्णालयात (LNJP) दाखल करण्यात आले आहे. या प्रवाशांना ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झाला आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी त्यांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी (genome testing) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

britain airport
'ओमिक्रॉन' वेगात पसरणारा स्ट्रेन; 'ही' खबरदारी अत्यंत महत्वाची

दिल्लीत दाखल झालेल्या यातील आठ जणांचा कोरोना चाचणी रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज आणखी चार जणांना दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्यांचा कोरोना रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही.

लोकनायक जय प्रकाश रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार म्हणाले की, रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रवाशांपैकी चार जण यूके, चार प्रवाशी फ्रान्सचे, तर काही जण टांझानियाचे आहेत. एक प्रवासी बेल्जियमचा असून या सर्वांची प्रकृती स्थिर असून केवळ एका व्यक्तीला ताप आहे. दरम्यान, या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी कोणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की हे पाच-सहा दिवसांत समोर येईल, असे सुरेश कुमार यांनी सांगितले.

तामिळनाडूत तीन जण पॉझिटिव्ह

ओमिक्रॉनचा धोका असलेल्या देशातून तामिळनाडूमध्ये दाखल झालेल्या एका लहान मुलासह दोन आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आज पहाटे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर त्यांचे नमुनेदेखील जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, या नागरिकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याच्या वृत्ताला राज्य सरकारने नाकार दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com