
कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकजण चिमुकल्यांसह पायी चालत असल्याचे चित्र दिसत आहे.
बिजापूर (छत्तीसगड): कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकजण चिमुकल्यांसह पायी चालत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, एक 12 वर्षाची चिमुकली तब्बल 100 किलो मीटर चालली. घर जवळ आले असतानाच तिने रस्त्यातच जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
तमिळनाडूकडे चालत निघालेल्या युवकाने रस्त्यात सोडले प्राण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासाची साधने बंद झाल्यामुळे अनेकजण पायी प्रवास करताना दिसत आहेत. यामध्ये लहान-लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, हृदय पिळवटून टाकणारी एक घटना छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये घडली आहे. येथील एक 12 वर्षांची जमालो मडकाम ही चिमुकली आपल्या काही कुटुंबियांसह तेलंगणातील पेरूर गावी कामासाठी गेली होती. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर गावातील 11 जण तेलंगणाहून बिजापूरच्या दिशेने पायी चालत निघाले होते. सतत तीन दिवस चालत होते. बिजापूर जिल्ह्यातील मोदकपाल भागातपर्यंत पोहचले. पण, चिमुकलीला त्रास होऊ लागला. रस्त्यातच तिने प्राण सोडला. यावेळी गाव फक्त 14 किलोमीटर अंतरावर होते.
घरातला तांदूळ संपला म्हणून खाल्ला 12 फूटांचा किंग कोब्रा...
जमालो मडकामच्या मृत्यूनंतर प्रशासनाने सर्वांना क्वारंटाइन केले आहे. जमालो मडकामच्या कुटुंबियांनी आपली एकुलती एक मुलगी गमावली आहे. तिच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी शवविच्छेदन आले. तिन दिवसांनी मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात आला. मृतदेह पाहिल्यानंतर कुटुंबियांनी फोडलेला टाहो पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
पोलिस निरीक्षकाने काढला रिव्हॉल्व्हर अन् झाडल्या गोळ्या...
बिजापूर येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बीआर पुजारी यांनी सांगितले, 'तेलंगणाहून चालत आलेल्या मजुरांमधील एका मुलीचा मृत्यू झाला समजले. यानंतर तिचा मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आला. तिच्यासोबत असलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सतत चालल्यामुळे व उष्णतेमुळे शरिरातील इलेक्ट्रॉल इम्बॅलेन्स अथवा पाण्याच्या कमतरतेमुळे तिचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.'