तमिळनाडूकडे चालत निघालेल्या युवकाने रस्त्यात सोडले प्राण...

TN youth dies after walking 500 kms to reach home during coronavirus lockdown
TN youth dies after walking 500 kms to reach home during coronavirus lockdown

चेन्नईः देशात कोरोना व्हायसमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अनेक मजूर हजारो किलोमीटर चालत आपल्या घराकडे निघाले आहेत. महाराष्ट्रातून तमिळनाडूकडे चालत निघालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. बी. लोकेश (वय 23) असे या मजूर युवकाचे नाव आहे.

देशात अचानक लॉकडाऊन केल्यानंतर अनेक मजून चालत आपल्या घराकडे निघाले असल्याचे पाहायला मिळत आहे. रोजगाराअभावी हे मजूर हजारो किमीचा प्रवास करू लागले आहेत. तमिळनाडूत बी. लोकेशने ५०० किमीचा प्रवास केल्यामुळे गुरूवारी (ता. 2) त्याचा मृत्यू झाला आहे.

नागपूरवरून 26 जण तमिळनाडूमधील नामक्कलपर्यंत पोहोचण्यासाठी पायी निघाले होते. यामध्ये लोकेशही होता. तीन, चार दिवसांपासून सतत पायी प्रवास केल्यामुळे लोगेश थकला होता. प्रवासादरदम्यान काहीजण खायला देत होते. काही ट्रक चालकांनी काही अंतरापर्यंत नेले होते. पण, पोलिसांनी मारहाण केल्यानंतर पुन्हा पायी प्रवास सुरू केला होता. जवळपास ५०० किमीचा प्रवास करून बुधवारी सर्वजण सिकंदराबाद येथे पोहोचले होते. दिवसभर चालून थकल्यानंतर लोकेश एका खोलीमध्ये बसला आणि बसल्याजागीच त्याने प्राण सोडला.

स्थानिक नेता अकुला बालकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकेशला सरकारी डॉक्टरकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत असल्याचे घोषित केले. लोगेशचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com