BJP leaders Quit Party: भाजपच्या आयटी सेलमधील 13 नेत्यांचा पक्षाला रामराम!

भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या पक्षातच या नेत्यांनी प्रवेश केला आहे.
BJP
BJPesakal

चेन्नई : भाजपच्या आयटी सेलमधील १३ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तसेच भाजप ज्या पक्षासोबत युतीमध्ये आहे त्या 'ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम' (AIDMK) या पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्वजण तामिळनाडूतील नेते आहेत. यानंतर भाजपनं एडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर भाजपच्या नेत्यांना विकत घेतल्याचा आरोप केला आहे.

यावर भाजपच्या आयटी विंगचे अध्यक्ष अनबरासन यांनी म्हटलं, "मी भाजपसाठी अनेक वर्षे काम केलंये. लोकांना माहिती आहे की, मी कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरु असलेल्या विचित्र कारभारामुळं मी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला"

BJP
Maharashtra Economic Survey 2022-23: आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर; 'असा' राहिल राज्याचा विकास दर

भाजपच्या ज्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे, त्यामध्ये १० आयटी विंगमधील जिल्हा सचिव आणि दोन आयटी विंग जिल्हा उपसचिवांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आयटी विंगचे प्रमुख निर्मल कुमार यांनी भाजपच्या अन्नामलाई यांच्यावर गंभीर आरोप करत अद्रमुकमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर हा राजीनाम्याचा सिलसिला कायम राहिला.

BJP
Juvenile Justice: अल्पवयीन असताना गुन्हा घडलेल्यांना पोलीस भरतीत डावलता येणार नाही - हायकोर्ट

या प्रकारानंतर अन्नामलाई यांनी आरोप केला की, "भाजपच्या काही नेत्यांनी अद्रमुकत प्रवेश केला. त्यांना वाटतंय की ते मोठा पक्ष चालवत असून भाजपच्या नेत्यांना विकत घेऊन त्यांचा पक्ष आणखी मोठा करणार आहेत. यावरुन एकच सिद्ध होतं की, भाजप तामिळनाडूत मोठा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com