esakal | एका आठवड्यात १३ पत्रकार कोरोना पॉजिटिव्ह; एकाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

एका 33 वर्षीय पत्रकाराचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. पत्रकार तेलंगणातील एका तेलुगू न्यूज वाहिनीवर काम करायचे. त्यांना 4 जून रोजी कोरोनाग्रस्त म्हणून गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एका आठवड्यात १३ पत्रकार कोरोना पॉजिटिव्ह; एकाचा मृत्यू 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हैदराबाद : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्यांही दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीच लाखांच्या पुढे गेला आहे. यातच एका 33 वर्षीय पत्रकाराचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. पत्रकार तेलंगणातील एका तेलुगू न्यूज वाहिनीवर काम करायचे. त्यांना 4 जून रोजी कोरोनाग्रस्त म्हणून गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पत्रकाराला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांच्यात न्युमोनिया आणि श्वसनासंबंधी आजार होता. त्यांना यापूर्वी मियासथीनिया ग्रेविस हा आजार जडला होता, असं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा 
-----------
सोनू सूदने मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा
-----------
त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तसेच डॉक्टरांचा एक गट त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. मात्र, रविवारी सकाळी त्यांना ह्रद्य विकाराचा झटका आला. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता त्यांना मृत घोषीत करण्यात आले, असं गांधी रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर एम राजा राव म्हणाले आहेत.

तेलंगणामध्ये गेल्या काही दिवसात अनेक पत्रकार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या आढवड्यात 13 पत्रकारांना कोविड-19 ची लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तेलंगणात रविवारी कोरोना संसर्गाचे 154 नवीन केसेस आढळून आले आहेत, तर 14 लोकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3650 झाला आहे. आतापर्यंत 137 लोकांना या विषाणूमुळे जीव सोडावा लागला आहे.

loading image