पाच दिवस, पाच ठिकाणं, पाच जणांचा बलात्कार...

वृत्तसंस्था
Friday, 9 August 2019

राजधानीमध्ये एक अल्पवयीन मुलीवर पाच दिवस, पाच ठिकाणी पाच जणांनी बलात्कार केल्याची खळबळजणक घटना घडली आहे.

नवी दिल्लीः राजधानीमध्ये एक अल्पवयीन मुलीवर पाच दिवस, पाच ठिकाणी पाच जणांनी बलात्कार केल्याची खळबळजणक घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, दोघे जण फरार आहेत.

दिल्लीमध्ये निर्भयावर झालेला सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली होती. देशभरातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत आंदोलने केली होती. मात्र, या घटनेनंतरही राजधानीमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. गुरुग्राम येथे 14 वर्षांच्या मुलीवर पाच दिवस पाच ठिकाणी पाच वेळा बलात्कार झाला आहे.

2 ऑगस्ट
मेघालयात राहणारी मुलीला नोकरी मिळवून देण्याचे आमीश दाखवून, अमन ऊर्फ छोटूने दिल्लीत बोलवून घेतले होते. अमन तिच्या ओळखीचा आहे. अमनने तिला ओमप्रकाश ऊर्फ लंबू याच्या घरी तिला घेऊन गेला. ओमप्रकाशने तिच्यावर 2 ऑगस्ट रोजी बलात्कार केला.

3 ऑगस्ट
पीडित युवतीला नोकरीसाठी चौमा येथील एका डीलच्या कार्यालयामध्ये नेण्यात आले. कार्यालयामध्ये एक महिला होती. पण, काही वेळानंतर ती बाहेर गेल्यानंतर भूपेंद्र नावाच्या व्यक्तीने बलात्कार केला.

4 ऑगस्ट
पीडित युवतीला नोकरीसाठी पुन्हा दुसऱया ठिकाणी नेण्यात आले. लोकेश नावाच्या युवकाने बळजबरीने दारू पाजून बलात्कार केला.

5 ऑगस्ट
पीडित युवतीला पुन्हा गुरुग्राम येथील राजेंद्र पार्कमध्ये आणण्यात आले. दिवसभर तेथे थांबल्यानंतर बलात्कार करण्यात आला.

6 ऑगस्ट
पीडित युवतीला 6 ऑगस्ट रोजी दिल्लीला घेऊन गेल्यानंतर पुन्हा तेथेही बलात्कार करण्यात आला.

युवकाच्या तावडीमधून सुटका करून घेत आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक तिला पुन्हा मेघालयात घेऊन गेले. घरी गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी भूपेंद्र, ओमप्रकाश व ऋतू नावाच्या युवकांना अटक केली असून, अन्य दोघे फरार झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 year old meghalaya girl gang raped 5 times at delhi