सरोजिनी नायडू यांची 140 वी जयंती; वाचा त्यांच्याबाबत...

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सरोजिनी नायडू यांची आज 140 वी जयंती.

नवी दिल्ली : सरोजिनी नायडू यांची आज 140 वी जयंती आहे. सरोजिनी नायडू यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना 'नायटेंगल ऑफ इंडिया' या नावाने ओळखले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी, 1879 ला हैद्राबाद येथे झाला होता. त्यांचे वडील एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांची आई एक तत्वज्ञ होती. सरोजिनी नायडू या अभ्यासात अत्यंत हुशार होत्या.

सरोजिनी नायडू या मद्रास विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा पास झाल्या होत्या.  16 वर्षाच्या असताना सरोजिनी नायडू उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेल्या होत्या. तेथे त्यांनी शिक्षण घेतले होते. सरोजिनी नायडू यांनी बालपणापासूनच गायनाची आवड होती.

किंग्स् कॉलेज, लंडन आणि गिरटन कॉलेज येथे शिक्षण घेतले होते. डॉ. गोविंद राजालू नायडू यांच्यासोबत त्यांचा विवाह वयाच्या 19 व्या वर्षी झाला. त्यानंतर 2 मार्च, 1949 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे सरोजिनी नायडू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचे निधन झाले. 

सरोजिनी यांच्याबाबत...

- सरोजिनी नायडू या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या पहिला महिला अध्यक्षा बनल्या होत्या. इतकेच नाहीतर भारतीय राज्य (गव्हर्नर ऑफ  युनायटेड प्रोविनस) पहिली महिला गव्हर्नर बनल्या होत्या. 

-1915 ते 1918 यादरम्यान सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता. गोपाळ कृष्ण गोखले, रविंद्रनाथ टागोर, अॅनि बेझेंट, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. 

- 1925 मध्ये साऊथ आफ्रिकेत ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या अध्यक्षपदाने ब्रिटिश सरकारकडून केसर-ए-हिंद या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 140th Birth Anniversary of Sarojini Naidu