रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी काढल्या 145 आळ्या; वर्षभरापूर्वी झाला होता कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maggots

रुग्णाच्या डोळ्यातून डॉक्टरांनी काढल्या 145 आळ्या; वर्षभरापूर्वी झाला होता कोरोना

बंगळुरू - बेंगळुरू येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान 65 वर्षीय रुग्णाच्या डोळ्यातून आणि नाकातून 145 आळ्या काढण्यात आल्या. रुग्णाने सुमारे एक वर्षापूर्वी कोरोना संसर्गानंतर म्युक्रोमायकोसिसवर (काळी बुरशी) उपचार घेतले होते.

हेही वाचा: Video: CM शिंदेंच्या भाषणाआधीच सभेतून लोक निघाले; नेत्यांना आवरतं घ्यावं लागलं भाषण

बेंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर येथील एसएस स्पर्श हॉस्पिटलच्या निवेदनानुसार , रुग्णाच्या नाकातील डेड टिश्शू (dead tissue) काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. तसेच नाकातील रुंद नलिका स्राव होण्यासाठी अधिक फायदेशीर असतात. ज्यामुळे क्रस्टिंग होते. त्यातच नाकाची नियमित स्वच्छता न केल्यास दुर्गंधीयुक्त स्त्राव नाकाच्या आत अंडी घालणाऱ्या आळ्यांना आकर्षित करतात. त्यामुळे कालांतराने आळ्या तयार होतात.

एसएस स्पर्श हॉस्पिटल ईएनटी सर्जन डॉ. मंजुनाथ एमके म्हणाले की, जर आळ्या काढून टाकल्या नसत्या तर त्या मेंदूपर्यंत पोहोचल्या असत्या. त्यामुळे मेंदूच्या टिश्शूंना नुकसान पोहोचले असते. शिवाय डोळा थेट मेंदूशी जोडलेला असतो, जर डोळ्याला बाधा झाली असती, तर आपात्कालीन परिस्थिती उद्भवली असती असंही डॉक्टर म्हणाले.

हेही वाचा: Pune News : तरुणीच्या विनयभंग प्रकरणावर झोमॅटोचं स्पष्टीकरण; काय म्हटलंय जाणून घ्या?

जर्नल ऑफ नेपाळ मेडिकल असोसिएशनच्या 2021 च्या संशोधनानुसार, आळ्या (मॅगॉट्स) नाक, कान, ट्रेकियोस्टोमीच्या जखमा, चेहरा, हिरड्यांमध्ये आढळून येतात.

डॉ मंजुनाथ पुढं म्हणाले की, “रुग्णाने तीन दिवसांपूर्वी नाकातून रक्तस्त्राव आणि डाव्या डोळ्याला सूज आल्याची तक्रार केली होती. तपासणीनंतर पहिल्या दिवशी रुग्णाच्या नाकातून 110 आळ्या काढण्यात आल्या. डोळा पूर्णपणे आंधळा झाल्याने आणि वेदनांमुळे रुग्णाने डोळा काढण्यास होकार दिला. रुग्णाच्या बुबुळातून सुमारे 35 आळ्या काढण्यात आल्या असून रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टर म्हणाले.

Web Title: 145 Worms Removed From The Nose And Eyes Old Man

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..