तब्बल 13 तास चालली भारत-चीनमधील चर्चेची 14वी फेरी, काय घडले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india china

तब्बल 13 तास चालली भारत-चीनमधील चर्चेची 14वी फेरी, काय घडले?

नवी दिल्ली: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) लष्करी तणाव कमी करण्यासाठी आणि सामान्य स्थिती परत आणण्यासाठी भारत-चीन (india china) लष्करी कॉर्प्स कमांडर-स्तरीय चर्चेची 14 वी फेरी (14th round of Corps Commander Level Talks) बुधवारी चुशुल-मोल्डो येथे पार पडली. ही चर्चा काल (ता.१२) सुमारे 13 तास चालली आणि रात्री 10:30 वाजता संपली.

सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय बाजूचे प्रतिनिधित्व 14 कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी केले. चीनने मंगळवारी सांगितले की, भारतासोबतच्या सीमावर्ती भागातील सद्यस्थिती “सामान्यत: स्थिर” आहे आणि त्याने पूर्व लडाखमधील संघर्षाच्या उर्वरित भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी बुधवारी कोर कमांडर-स्तरीय 14 व्या फेरीची चर्चा होणार असल्याची पुष्टी केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, 20 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर दोन्ही बाजूंच्या लष्करी चर्चेच्या 14 व्या फेरीपूर्वी भारत पूर्व लडाखमध्ये उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांच्या समस्या सोडवण्यासाठी चीनसोबत फलदायी संवादाची अपेक्षा होती.

हेही वाचा: योगींना पहिला धक्का देणाऱ्या मंत्री मौर्य यांच्या अटकेसाठी वॉरंट

10 ऑक्टोबर 2021 रोजी लष्करी चर्चेची 13 वी फेरी झाली होती. परंतू त्यात संघर्षावर तोडगा निघाला नव्हता. भारत आणि चीनने गेल्या वर्षी 18 नोव्हेंबरला डिजिटल राजनैतिक चर्चेत पूर्व लडाखमधील संघर्षाच्या उर्वरित भागातून सैन्य पूर्णपणे मागे घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच लष्करी चर्चेची 14 वी फेरी आयोजित करण्याचे मान्य केले होते.

हेही वाचा: बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती; भाजपची शरद पवार यांच्यावर टीका

पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील किनारी आणि गोग्रा परिसरात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया दोन्ही बाजूंनी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या मालिकेमुळे गेल्या वर्षी पूर्ण झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संवेदनशील भागात सध्या दोन्ही देशांचे सुमारे 50,000 ते 60,000 सैनिक आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top