esakal | देशभरात २४ तासांत १५ लाख कोरोना चाचण्या

बोलून बातमी शोधा

देशभरात २४ तासांत १५ लाख कोरोना चाचण्या}

कोरोनारुग्ण शोधण्यासाठी देशभरात २४ तासांत १४ लाख ९२ हजार ४०९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात कोटी चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण ८.४४ टक्के आहे.

देशभरात २४ तासांत १५ लाख कोरोना चाचण्या
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनारुग्ण शोधण्यासाठी देशभरात २४ तासांत १४ लाख ९२ हजार ४०९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात कोटी चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण ८.४४ टक्के आहे. दहा लाखामागे ४९ हजार ९४८ चाचण्या झाल्या आहेत. रोजच्या चाचण्यांमध्ये झालेल्या वाढीवरून भारतात चाचण्यांच्या सुविधा अधिक सक्षम झाल्याचे दिसून येते असे मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील चाचण्यांची संख्याही वाढली आहे. दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाना, ओडिशा आदी राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वांत चांगले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा