esakal | बिहारमध्ये 16 जणांचा संशयास्पद मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

बिहारमध्ये 16 जणांचा संशयास्पद मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

बिहारमध्ये 16 जणांचा संशयास्पद मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

sakal_logo
By
विनायक होगाडे

पाटना : बिहारमध्ये जवळपास 16 जणांचा गूढ पद्धतीने मृत्यू झाला आहे. पूर्व चंपारण्यमधील हूच भागात गेल्या 2 ते 3 दिवसांत हे मृत्यू झाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी मद्यपान केल्याचा उल्लेख केलेला नाही. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. FIR दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सध्या 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

गावकऱ्यांनी या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेहांवर अंतिम संस्कार देखील करुन टाकले आहेत. त्यामुळे अचानकच झालेल्या 16 मृत्यूंचं रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे. अधिकारी याबाबत सखोर तपास करत आहेत. या गावातील स्थानिक लोक यासंदर्भात बोलायला तयार नाहीयेत. आम्ही सध्य परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत आहोत, असं बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी या प्रकरणावर म्हटलं आहे.

loading image