esakal | …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

…तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

sakal_logo
By
महेंद्र महाजन


नाशिक : परप्रांतीयांसंबंधी धोरण बदलत नाही तोपर्यंत मनसेशी युती शक्य नाही, अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नकार दिला. पण त्याचवेळी नाशिकमध्ये योग आल्यास राज ठाकरेंची भेट घेईन असेही ते सांगायला विसरलेले नाहीत.
राज ठाकरेंचे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे, असे सांगत पाटील यांनी एकट्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणे शक्य नसल्याचा टोला लगावला. त्याचवेळी राज ठाकरे यांनी व्यापक राजकारणात प्रवेश केल्यास युती शक्य असल्याचे सांगितल्याने युतीसाठी भाजपने दरवाजे खुले ठेवल्याचे स्पष्ट झाले. संघटनात्मक बैठकीसाठी पाटील हे नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते. (no alliance with mns unless there policy changes says chandrakant patil)

काही घडलं नसेल, तर घाबरण्याचे कारण नाही..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडीविषयक चौकशीच्या अनुषंगाने बोलताना ईडी स्वायत्त संस्था असून केंद्राच्या अखत्यारित काम करत असल्याने मी जास्त बोलू शकत नाही, असे सांगितले. शिवाय माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयीच्या चौकशीबद्दल बोलताना ते म्हणाले, की काही घडलं नसेल, तर चौकशीला घाबरण्याचे कारण नाही. चौकशी होत राहील. काही केलं नसेल, तर निष्पन्न होणार नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाही. आम्ही अन्यायाच्या विरोधात आक्रमक आहोत. संजय राठोड आणि साखर कारखान्यातील घोटाळ्याविरोधात आम्ही आवाज उठवला. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नाही.

मुंडेंची नाराजी अन कारवाईचा संबंध नाही

पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्यासंबंधी कारवाई केली नाही. इतर अनेक कारखान्यांवर कारवाई केली. त्यामुळे मुंडे यांच्या नाराजीचा आणि कारखान्यावरील कारवाईचा काहीही संबंध नाही, असे सांगत असताना पाटील यांनी मुंडे नाराज नाही, तर त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले.

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणे अशक्य

शिवसेनेबरोबर आमचे वैर नाही. सरकारविरोधात आमचे आंदोलन आहे. तसेच शिवसेनेसोबत आमचा पंगा नाही, असे पाटील यांनी सांगितल्याने शिवसेनेबाबत त्यांची मवाळ भूमिका असल्याचे दिसून आले. पाटील म्हणाले, की आमच्या जागा अधिक असताना केवळ मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षासोबत सरकार स्थापन करणे मान्य नाही. महाराष्ट्राच्या राजकारणत तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवलीय. आता विश्वासघात आणि अपमान देखील सहन करतात. सत्ता हे असे फेविकॉल आहे, की ती सोडणे अशक्य आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणे शक्य वाटत नाही.

(no alliance with mns unless there policy changes says chandrakant patil)

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २५७ रुग्ण कोरोनामुक्‍त

loading image