Vaccination : दोन्ही डोसनंतर किती लोकांचा मृत्यू; केंद्राने दिले उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

Vaccination : दोन्ही डोसनंतर किती लोकांचा मृत्यू; केंद्राने दिले उत्तर

नवी दिल्ली : जगभरासह भारतात धुमाकूळ घालणारी कोरोनाची (Corona Third Wave) तिसरी लाट ओसरल्याचे सकारात्म चित्र पाहण्यास मिळत असून, भारतात अनेक नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. दरम्यान, दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा साईड इफेक्टमुळे (Vaccination Side Effect) किती जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत केंद्राने स्पष्टीकरण दिले असून, लसीच्या विपरीत परिणामांमुळे आतापर्यंत 167 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister Bharti Pawar) यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. (Corona Vaccination Said Effect)

हेही वाचा: मोठी बातमी : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

लोकसभेत बोलताना भारती पवार म्हणाल्या की, लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्याच्या साईड इफेक्टमुळे सर्वाधिक 43 मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. तर, महाराष्ट्रात 15, पश्चिम बंगालमध्ये 14 आणि मध्य प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 12 मृत्यू झाल्याचे भारती पवार यांनी यावेळी सांगितले.

स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये सौम्य लक्षणे

3 फेब्रुवारीपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये लसीकरणानंतरच्या उद्भवलेल्या साईड इफेक्टची 13 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत मात्र, या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली, अशी माहिती उपस्थित केलेल्या दुसर्‍या एका प्रश्नाला लेखी उत्तरात आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

Web Title: 167 People Died Due To Side Effects Of Corona Vaccination Says Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top