दिलासादायक! देशातील कोरोनाचा प्रभाव होतोय कमी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 7 October 2020

देशातील कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, जी एक मोठी दिलासादायक बाब आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोनातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, जी एक मोठी दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत देशात 56.6 लाखांहून जास्त जण कोरोनामुक्त झाले असून कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 84.7 टक्क्यांच्या वर गेला आहे. महत्वाचे म्हणजे देशातील 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा रिकव्हरी रेट देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

- देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56 लाखांपेक्षा जास्त.

- देशात 8 कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या.

- मागील एका आठवड्यात जवळपास 80 लाख कोरोना चाचण्या.

 -मागील 2 आठवड्यांपासून 10 लाखांच्या आत सक्रिय रुग्णांची संख्या.

- रिकव्हरी रेट 84 टक्क्यांपेक्षा जास्त

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 67 लाखांच्या वर गेला आहे. मागील 24 तासांत देशात 986 कोरोना रुग्णांचा मृत्यू होऊन 72 हजार 49 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 67 लाख 57 हजार 132 वर गेला आहे. तर सध्या देशात 9 लाख 7 हजार 883 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.  दिलासादायक बाब म्हणजे देशात 57 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Union Health Ministry) दिली आहे.

 

मंगळवारी एका दिवसात कोरोनाच्या 11 लाख 99 हजार 857 चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात केलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी 22 लाख 71 हजार 654 झाल्याची माहिती आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 states recovery rate is greater than national average