Organ Donor : अवघ्या 17 वर्षीय मुलीने वडिलांना दिलं जीवनदान! ठरली सर्वात कमी वयाची अवयवदाता

youngest organ donor
youngest organ donor

नवी दिल्ली - केरळमधील एका १७ वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना यकृताचा काही भाग दान करून देशातील सर्वात कमी वयाची अवयवदाता बनली आहे. १२ वीची विद्यार्थीनी देवआनंद हिने आपल्या आजारी वडिलांना वाचवण्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी यकृताचा एक भाग दान केला. यासाठी तिने केरळ उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

youngest organ donor
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर बोलावली आज पुन्हा तातडीची बैठक!

न्यायालयाच्या परवानगीनंतर देवानंदने ९ फेब्रुवारीरोजी यकृताचा काही भाग दान केला. 48 वर्षीय प्रतिश त्रिशूरमध्ये एक कॅफे चालवतो. देव आनंद यांनी आपल्या आहारात आमूलाग्र बदल केले आणि आपले यकृत दान करण्यासाठी सर्वोत्तम स्थितीत रहावे यासाठी नियमित व्यायामासह स्थानिक जिममध्ये देखील व्यायाम केला. अलुवा येथील राजगिरी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. देव आनंद यांच्या धाडसी कामाचे कौतुक करत रुग्णालयाने शस्त्रक्रियेचा खर्च माफ केला आहे.

youngest organ donor
Shivsena: राज्यात पुन्हा खळबळ! ठाकरे गटाचा पुन्हा एकदा सुपडासाफ होणार?

आठवडाभर रुग्णालयात राहिल्यानंतर देवआनंद हिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कुटुंबाला योग्य दाता न मिळाल्याने देवआनंद हिने आपल्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला होता.

मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ मधील तरतुदींनुसार अल्पवयीन मुलांना अवयवदान करण्याची परवानगी नाही. त्यानंतर त्यांनी सर्व शक्यतांचा शोध घेतला आणि केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. अशाच एका प्रकरणात न्यायालयाने एका अल्पवयीन मुलाला अवयवदानाची परवानगी दिली होती. न्यायालयाने देवआनंद हिला अवयव दानासाठी हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com