Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर बोलावली आज पुन्हा तातडीची बैठक!

मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच दिलं आहे.

या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली असून आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Uddhav Thackeray
Raj Thackeray: शिवजयंती निमित्त राज ठाकरेंनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला मोलाचा सल्ला

तर या निर्णया विरोधात उद्धव ठाकरे यांनी काल तातडीची बैठक बोलवली होती. त्यानंतर आज देखील उद्धव ठाकरे यांनी तातडीची महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत पुढील पक्षाची भूमिका आणि कोर्टात कशा प्रकारे बाजू माडांची याची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. ही बैठक साडे तिन वाजता मातोश्रीवर बोलवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com