esakal | 'सैराट' झालेल्या 'प्रिन्स'ने संपवले बहिणीला
sakal

बोलून बातमी शोधा

17 Year Old Kills Sister Over Inter Caste Marriage at indore

बहिणीने खालच्या जातीमधील युवकाशी पळून जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणीवर गोळी झाडून तिची हत्या केली.

'सैराट' झालेल्या 'प्रिन्स'ने संपवले बहिणीला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इंदोरः बहिणीने खालच्या जातीमधील युवकाशी पळून जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे चिडलेल्या भावाने बहिणीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

इंदोरपासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या रावद गावामध्ये ही घटना घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावद गावामधील बुलबुल नावाची युवती राहात होती. त्याच गावामध्ये कुलदीप नावाचा युवक राहात होता. दोघांचे एकमेकांकडे पाहणे सुरू होते. एकमेकांकडे पाहात असतानाच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांच्या प्रेमाची चर्चा गावात पसरली. दोघांच्या घरीही याबाबत माहिती गेली. बुलबुल ही श्रीमंत घरातील तर कुलदीप हा गरीब घरामधील. शिवाय, तो खालच्या जातीमधील. यामुळे बुलबुलच्या कुटुंबियाचा प्रेमाला विरोध होता. तिच्या घरच्यांनी कुलदीपला धमकीही दिली होती. शिवाय, प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. विवाहाला घरचा विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन विवाह केला व दुसऱया गावामध्ये जाऊन राहू लागले.

विवाहानंतर कुलदीप नोकरी करत होता तर बुलबुल घरीच होती. विवाह झाल्यानंतर काही महिन्यांनी वातावरण शांत झाल्यामुळे ते पुन्हा गावामध्ये राहायला आहे. याबाबतची माहिती बुलबुलच्या घरी समजली. तिचा सावत्र भाऊ बुलबुलच्या घरी गेला व वाद घालू लागला. दोघांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर त्याने खिशातून गावठी पिस्तूल काढले व बहिणीवर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे धावले. यावेळी सावत्र भाऊ पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बुलबुलला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, कुलदीपच्या तक्रारीवरून बुलबुलच्या सावत्र भावाला ताब्यात घेतले असून, अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

loading image
go to top