सुसाईड नोट लिहित १७ वर्षीय मुलीनं संपवलं जीवन, पोलिस निरीक्षक निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide

सुसाईड नोट लिहून मुलीनं संपवलं जीवन, पोलिस निरीक्षक निलंबित

चेन्नई : एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना करूर येथे घडली. तिच्या खोलीमध्ये सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये तिचा लैंगिक छळ (Physical abused karur) झाल्याचा उल्लेख आहे. ही घटना तमिळनाडूमधील करूर (Karur Tamil Nadu) येथे घडली असून तक्रार देण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर देखील पोलिसांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कन्नडसन यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर

पीडितेचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती NEET चा अभ्यास करत होती. ती शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरी परतली. त्यानंतर घरातील पंख्याला गळफास घेतला. आई घरी आल्यानंतर ती लटकेल्या अवस्थेत दिसली. तिच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट पडलेली होती. त्यामध्ये तिचा लैंगिक छळ झाला असून आरोपीची ओळख सांगण्याची भीती वाटत असल्याचेही म्हटले होते.

त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र, तिच्या तीन नातेवाईकांवर पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. त्यावरून पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागे शाळेचा हात असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. त्यांनी घरी येऊन घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. तसेच माझी मुलगी हुशार होती. पण, तिला रसायनशास्त्राच्या वर्गात बसायला आवडत नव्हते. तसेच तिची रसायनशास्त्राची पुस्तक देखील फाडलेली मी पाहिली, असं तिच्या आईनं सांगितलं.

काँग्रेसचे खासदार जोथिमनी यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. पोलिसांनी कुटुंबाशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच इन्स्पेक्टर कन्नधासन हे पीडित कुटुंबीयांशी आरोपींसारखे वागले आणि त्यांच्यासोबत आलेल्या तिच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला.

loading image
go to top