परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर

मुंबई: काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) कुठे आहेत? अशी चर्चा सुरू आहे. अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. परमबीर सिंह कुठे भारताबाहेर (India) गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) ही माहिती दिली. पुढच्या ४८ तासात सीबीआयसमोर (Cbi) हजर होण्यास तयार आहेत असे त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. तसेच अटकेपासून संरक्षण दिले आहे.

हेही वाचा: "परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करा"

परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीनं कोर्टात सांगण्यात आले. परमबीर सिंह कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. परमबीर सिंह चंदीगड येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.

परमबीर सिंह देशात किंवा अन्य कुठे आहेत, ते समजल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेऊ असे १८ नोव्हेंबरला न्यायाधीश संजय किशन कौल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केलं होतं. आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तो पर्यंत कुठलीही सुनावणी होणार नाही, संरक्षण मिळणार नाही, असे खंडपीठाने परमबीर सिंह यांच्या वकिलांना सांगितले होते.

बिमल अग्रवाल यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दोन हॉटेल्सविरोधात कारवाई करण्याची धमकी देऊन आपल्याकडून ११.९२ लाख रुपये उकळले, असा आरोप केला होता.

loading image
go to top