Republic Day : 'आयटीबीपी'च्या जवानांनी -20 डिग्रीत केले झेंडावंदन 

वृत्तसंस्था
Sunday, 26 January 2020

आयटीबीच्या हिमवीर या पथकाने लडाखमध्ये ही शौर्यास्पद कामगिरी केली आहे. यावेळी जवानांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या जयघोष केला. देशभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. 

श्रीनगर : भारताच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला प्रत्येक जवान आज (रविवार) 71 प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असून, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत असताना आणि हाडं गोठवणारी थंडी असतानाही इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) उणे 20 तापमानात ध्वजारोहण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुमारे 17 हजार फूट उंचीवर असलेल्या लडाखमध्ये जवानांनी बर्फात भारताचा तिरंगा फडकाविला. यावेळी जवानांनी बर्फातून वाट करत एकप्रकारे पथसंचलन केले. जवानांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. जवानांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

आयटीबीच्या हिमवीर या पथकाने लडाखमध्ये ही शौर्यास्पद कामगिरी केली आहे. यावेळी जवानांनी 'भारत माता की जय', 'वंदे मातरम'च्या जयघोष केला. देशभरात आज मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At 17000 feet ITBP Himveers celebrate Republic Day in Ladakh's freezing temperature