रतन टाटांची मराठी तरुणाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

18 yr old Mumbai boy's startup has ₹6 crore annual revenue and Ratan Tata as investor
18 yr old Mumbai boy's startup has ₹6 crore annual revenue and Ratan Tata as investor
Updated on

मुंबई : टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील एका मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्टअप फार्मसी कंपनीमध्ये ५० टक्के गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आगहे. अर्जुन देशपांडे असे या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दोन वर्षांपूर्वी अर्जुन देशपांडे याने आपल्या जनरिक आधार नावाच्या फार्मसीची सुरूवात केली होती. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते. अर्जुन देशपांडे यांनं आपल्या आई-वडिलांकडून आर्थिक मदत घेत दोन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला होता.

प्रत्येक देशात वेगळी पद्धत; कोणत्या देशात कसे होतात कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या व्यवहारावर चर्चा सुरू होती अशी माहिती अर्जुन देशपांडेने दिली. अर्जुन म्हणाला, 'टाटांना या व्यवसायात रस होता. तसंच व्यवसाय चालवण्यासाठी त्यांना अर्जुनचं मेंटोरही बनायचं होतं म्हणून त्यांनी भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांनी जनरिक आधारमध्ये ५० टक्क्यांची भागीदारी केली आहे. तसंच याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीही रतन टाटा यांनी पेटीएम, स्नॅपडील, क्योरफिट, अरबन लॅडर, लेन्सकार्ट आणि लायबरेट या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.

अर्जुन देशपांडे यांच्या कंपनीविषयी
सध्या या कंपनीचं वार्षिक ६ कोटी रूपयांचा व्यवसाय आहे. ही कंपनी एक युनिक फार्मसी अॅग्रिगेटर बिझनेस मॉडेलाचा वापर करते. थेट औषध उत्पादकांकडून औषधं खरेदी करून ती औषधांच्या किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे होलसेलरचं तब्बल १६ ते २० टक्क्यांच्या मार्जिनची बचत होते. मुंबई, पुणे, बंगळुरु आणि ओडिसातील ३० रिटेलर या कंपनीशी जोडले गेले आहेत. जनरिक आधारमध्ये सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजिनिअर आणि मार्केटिंगमधील तज्ज्ञ मंडळी आहेत. येत्या वर्षभरात १ हजार फ्रेन्चायझी स्टोअर उघडण्याचा कंपनीचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com