Ayodhya : 1800 कोटी रुपयांत बांधणार राम मंदिर, परिसरात 'या' मूर्तींचेही होणार दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya : 1800 कोटी रुपयांत बांधणार राम मंदिर; परिसरात 'या' मूर्तींचेही होणार दर्शन

मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत 400 कोटी होईल असा अंदाज होता.

Ayodhya : 1800 कोटी रुपयांत बांधणार राम मंदिर; परिसरात 'या' मूर्तींचेही होणार दर्शन

अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत 400 कोटी होईल असा अंदाज होता. परंतु 18 महिन्यांनंतर ही किंमत जवळपास 1800 कोटींवर येऊ शकते असे बोलले जात आहे.

चंपत राय पुढे म्हणाले, 'राम मंदिराच्या उभारणीचा खर्च अंदाजित आहे. त्यात अजून सुधारणा होऊ शकते.' रविवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक झाली यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत रामजन्मभूमी संकुलात महान व्यक्ती आणि हिंदू धर्माशी संबंधित साधू-संतांच्या पुतळ्यांनाही स्थान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

हेही वाचा: Health : लहान मुलांचे पोट खराब झाल्यास सहजपणे पचणारे कोणते पदार्थ खायला द्याल?

महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र आणि महर्षी अगस्त यांच्यासह निषादराज, माता शबरी आणि जटायू यांनाही पूजेसाठी स्थान देण्यासाठी चर्चा झाली आहे. ट्रस्टच्या नियमांवर विचार करण्यात आला असून अनेक सूचना देवून ही नियमावली अंतिम करण्यात आली आहे. या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्यासह दहा विश्वस्त उपस्थित होते, असंही चंपत राय यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राम मंदिराची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपवल्याचीही चर्चा आहे. केंद्रीय दलाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. सध्या मंदिराच्या उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत गर्भगृहाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मंदिर उभारणीच्या प्रगतीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे.

हेही वाचा: Tourism : प्री वेडिंग शूटसाठी परफेक्ट ठिकाणं, अविस्मरणीय आठवणी ठेवा जपून..

यंदा जूनमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली होती. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी केली आणि तेव्हापासून मंदिराच्या बांधकामाला गती आली आहे.

Web Title: 1800 Crore To Be Incurred For Construction Of Ram Mandir In Ayodhya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ayodhya Ram MandirAyodhya