Tourism : प्री वेडिंग शूटसाठी परफेक्ट ठिकाणं, अविस्मरणीय आठवणी ठेवा जपून..

कोणत्याही नवीन कपलला उत्साहात करायचे असते ते म्हणजे प्री वेडिंग शूट.
Tourism : प्री वेडिंग शूटसाठी परफेक्ट ठिकाणं, अविस्मरणीय आठवणी ठेवा जपून..
Summary

कोणत्याही नवीन कपलला उत्साहात करायचे असते ते म्हणजे प्री वेडिंग शूट.

सध्या पावसाळ्याचे वातावरण असले तरी आता काही दिवसांत पुन्हा एकदा लग्नांचा सिझन सुरु होईल. मग लग्न ठरलेल्या घरातील कोणत्याही सदस्याला वेध लागते ते कार्यक्रमांचे. लग्नात कोणते कार्यक्रम घ्यायचे, कधी घ्यायचे, कोणते मेन्यु ठरवायचे अशा तयारीत सगळेजण असतात.

दरम्यान, या सगळ्यात महत्वाचे आणि कोणत्याही नवीन कपलला उत्साहात करायचे असते ते म्हणजे प्री वेडिंग शूट. सध्याच्या काळात हा एक नवीन ट्रेंड आला आहे. लग्न करणाऱ्या कोणत्याही नवीन कपलला हा इवेंट महत्वाचा वाटतो. त्यामुळे ते या शूटच्या तयारीत असतात.

अशावेळी शूटसाठी ठिकाणे ठरवली जातात. मात्र अनेकांना कोणत्या ठिकाणी शूट करावे हा प्रश्न पडतो. तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास तुम्ही हा संपूर्ण लेख वाचा. यातून तुम्ही तुमच्या प्री वेडिगंसाठी एक रोमॅंटिक ठिकाण निवडू शकता.

आग्रा

आग्रा हे ठिकाण देशातील बेस्ट ठिकाणांपैकी एक आहे. देशासह परदेशातील अनेकजण या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी हजेरी लावतात. हे भारतातील काही खास ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. ताजमहालमसोर एक सुंदर फोटोशूट तुम्ही करु शकता.

Tourism : प्री वेडिंग शूटसाठी परफेक्ट ठिकाणं, अविस्मरणीय आठवणी ठेवा जपून..
SEBI : अप्रमेय इंजिनिअरिंगचा IPO लवकरच येणार, सेबीकडे कागदपत्र सादर...

जयपूर

पिंक सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध असणारे एक शहर म्हणून जयपूरकडे पाहिलं जातं. जयपूर हे ऐतिहासिक किल्ल्यांसाठी ओळखलं जातं. येथील सुंदर राजवाडे, महेल, रिसॉर्ट्स हे अनेकांचे मन आकर्षित करुन घेतात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फोटोशूट करु शकता.

गोवा

रोमॅंटिक समुद्रकिनारे आणि दमट वातावरण, खारं वार या सगळ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला गोव्याला भेट द्यावी लागेल. इथे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाश्चिमात्य देशांचा अंदाज येईल. देशात प्री वेडिंगसाठी हे एक बेस्ट ठिकाण आहे. महाराष्ट्रातील अनेक कपल या ठिकाणी शूटसाठी जातात. येथील सुंदर समुद्रकिनारे अनेकांना आकर्षित करतात.

केरळ

केरळ हे एक हनिमून डेस्टिनेशनसाठी प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटन साधारणत: डिसेंबर महिन्यात या ठिकाणी भेट देतात. केरळच फ्रेश वातावरण आणि तेथील सुंदर समुद्रकिनारे हे अनेकांना आकर्षित करतात. याशिवया केरळचं निसर्गसौंदर्य हे अनेकांचं मन हेरत असं म्हटंल जातं. त्यामुळे केरळमधील अशा काही रोमॅंटिक ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता.

Tourism : प्री वेडिंग शूटसाठी परफेक्ट ठिकाणं, अविस्मरणीय आठवणी ठेवा जपून..
Health : मसालेदार पदार्थ खाल्ल्याने कोणते तोटे होतात? पहा...

मनाली

हिमाचल प्रदेशातील मनाली हे एक बेस्ट ठिकाण आहे. प्री वेडिंग शूटसाठी हे ठिकाण तुम्ही निवडू शकता. येथे बर्फ आणि डोंगराळ भागात तुम्ही बेस्ट शूट करू शकता. मनाली हे हनिमून डेस्टिनेशनही आहे त्यामुळे येथील बर्फाच्छादित मैदानांवर तु्म्ही सुंदर फोटो क्लिक करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com