1857 Revolution Temple : १८५७ च्या लढाईशी जोडलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी युपीत मुस्लिम तरुणाचा पुढाकार; जाणून घ्या कारण!

UP Heritage : १८५७ च्या संग्रामाशी जोडलेल्या मोहन मंदिराच्या पुनरुज्जीवनाची मोहीम एका मुस्लिम तरुणाने हाती घेतली आहे. या मोहिमेत शहीदांच्या वंशजांचाही सक्रिय सहभाग दिसून येतो.
Muslim youth revives 1857 Revolution Temple, heritage restoration effort highlighting unity and forgotten history.

Muslim youth revives 1857 Revolution Temple, heritage restoration effort highlighting unity and forgotten history.

Sakal

Updated on

उत्तर प्रदेश : सेंथल येथील एक मुस्लिम तरुण १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडलेला विस्मृतीत गेलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याच्या मोहिमेवर सक्रिय झाला आहे. हा तरुण १८५७ चे शहीद खेमकरन आणि भोले बेलदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवाब गालिब अली यांच्या कुटुंबाने बांधलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करू इच्छितो. आज हे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे आणि जवळपास आपली ओळख गमावून बसले आहे. या तरुणाने मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून या जागेला राज्याचे ऐतिहासिक वारसा स्थळ (Historical Heritage Site) घोषित करण्याची आणि संरक्षणाची मागणी केली आहे. या मोहिमेत शहीदांचे वंशजही त्याच्यासोबत उभे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com