186 Years Old Royal Kitchen : नवाबाने सुरू केलेलं स्वयंपाकघर तब्बल २०० वर्ष चालवतंय मोफत अन्नछत्र

भोजनालयाची सुरुवात झाली होती अवधचे नवाब मोहम्मद अली शाह यांच्या कारकिर्दीत
186 Years Old Royal Kitchen
186 Years Old Royal Kitchen esakal

186 Years Old Royal Kitchen : या भोजनालयाची सुरुवात झाली होती अवधचे नवाब मोहम्मद अली शाह यांच्या कारकिर्दीत म्हणजेच 1837 मध्ये. आपल्या देशात लंगर किंवा मग लोकांना मोफत जेवायला वाढायची प्रथा खूप जुनी आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, कोणतीही व्यक्ती अशा जेवणावळी मध्ये बसून कोणतेही शुल्क न भरता भोजन करू शकते. देशातील अनेक लहान-मोठ्या धार्मिक स्थळांवर असं मोफत अन्न दिलं जातं. तुम्ही अशी अनेक ठिकाणं पाहिली असतील पण आज आम्ही आज अशा एका मोफत भोजनालयाची गोष्ट सांगणार आहोत, जे कित्येक वर्षांपासून चालवले जात आहे.

186 वर्ष जुने भोजनालय

या भोजनालयाची सुरुवात झाली होती अवधचे नवाब मोहम्मद अली शाह यांच्या कारकिर्दीत म्हणजेच 1837 मध्ये. त्याच ठिकाणी छोटा इमाम बडा बांधल्यानंतर त्याची सुरुवात झाली. या स्वयंपाकघरात शाकाहारी जेवणाची मेजवानी असायची. या भोजनालयाची खास गोष्ट म्हणजे इथे सर्व धर्माचे लोक जेवण करू शकतात. आज 186 वर्षांनंतरही हे भोजनालय सुरू आहे.

186 Years Old Royal Kitchen
Vastu Tips : कृपादृष्टी मिळवायची असेल तर देवाला नैवेद्य दाखवताना करू नका या चूका, महागात पडेल!

रमजान महिन्यात या स्वयंपाकघरात 24 तास अन्न तयार केले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भोजनालयात दररोज 50 किलो जेवण बनवले जातात. इथे चपत्यांची तर गणतीच नाही, या सोबत हरभरा डाळ आणि बटाट्याची आमटी देखील इथे मोठ्या प्रमाणात बनवली जाते.

186 Years Old Royal Kitchen
Relationship Tips : पार्टनरचा विश्वास जिंकायचाय? जाणून घ्या सोप्या टिप्स, लोक तुम्हाला म्हणतील ‘परफेक्ट कपल’

अन्नावर कोणतेही निर्बंध नाहीत

गरीब लोकांशिवाय इतर धर्मातील गरजू लोक येथे मोफत अन्न खातात. यासोबतच गरजू लोक आपल्या कुटुंबासाठी जेवणही येथूनच घेऊन जाऊ शकतात. इथे चांगली गोष्ट अशी आहे की जेवायला जाताना कोणालाही अडवलं जात नाही, जो जेवण मागतो त्याला तेवढ अन्न दिलं जातं. येथे सकाळी 11 वाजल्यापासून जेवण सुरू होतं, जे संध्याकाळी इफ्तारीच्या वेळेपर्यंत उपलब्ध असते.

186 Years Old Royal Kitchen
Dry Skin Care Tips : कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एक्सपर्ट्स सांगतात काही घरगुती उपाय

या भोजनालयाच्या संदर्भात इतिहासकार डॉ. रवी भट्ट म्हणतात की, मोहम्मद अली शाह यांनी छोटे इमामबारा बांधण्यासाठी ब्रिटिशांकडे 26 लाख जमा केले होते. पुढे ब्रिटिश राजवट संपल्यावर हा पैसा हुसेनाबाद ट्रस्टकडे गेला. या पैशातून हे स्वयंपाकघर चालवले जात आहे. त्याची सुरुवात खुद्द नवाबाने केली होती.

186 Years Old Royal Kitchen
Weight Loss Tips: वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, असे सेवन केल्यास वजन लवकर होऊ शकते कमी

येथील नोकर मुर्तुजा हुसेन उर्फ राजूच्या म्हणण्यानुसार, हे नवाबांच्या काळातील स्वयंपाकघर आहे. त्यामुळे याला रॉयल किचन म्हणतात. ते 24 तास खुले असते. या किचनचे वैशिष्ट्य म्हणजे येथे शुद्ध आणि शाकाहारी जेवण मिळते. यासोबतच जेवणासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत. शाकाहारी जेवणामुळे येथे सर्व धर्माचे लोक येतात आणि जेवण करतात. कोणीही उपाशी राहू नये म्हणून संध्याकाळी हुसैनाबाद ट्रस्टकडे इफ्तारीसाठी येणाऱ्या मशिदींमध्ये हे अन्न पाठवले जाते.

186 Years Old Royal Kitchen
Weight Loss Tips: वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, असे सेवन केल्यास वजन लवकर होऊ शकते कमी

रिपोर्ट्सनुसार, येथे रोज अनेक लोक जेवण घेण्यासाठी येतात. रमजान महिन्यात येथे मोठी रांग असते. लोक अन्न पॅक करून घेऊन जातात आणि घरी खातात. जेवणाची चवही खूप छान असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com