Vastu Tips : कृपादृष्टी मिळवायची असेल तर देवाला नैवेद्य दाखवताना करू नका या चूका, महागात पडेल!

देवाच्या नैवेद्याचं नंतर काय करावं?
Vastu Tips
Vastu Tipsesakal

Vastu Tips : आपल्याकडे कोणताही सण केला तर आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो. आणि त्यानंतरच सगळे ग्रहण करतात. देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता, दुपारच्या रात्रीच्या जेवणाचे ताट आधी देवाला दाखवतात अन् मग ते स्वत: ग्रहण करतात.

सर्वसामान्य घरात देवाला जपलं जातं. देवाला आवडणारा पदार्थ, आवडते फूल, मंत्र इत्यादींची काळजी घेतली जाते. प्रत्येक देवतेची पूजा नियमानुसार केली पाहिजे, तरच पूजेचे पूर्ण फळ मिळते. पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

नैवेद्य अर्पण करताना झालेल्या चुकीमुळे देवाचा रागही येऊ शकतो, त्यामुळे नैवेद्याशी संबंधित या नियमांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. नैवेद्याशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत

Vastu Tips
Vastu Tips : नैवेद्य संबंधित करू नका या चुका, येईल गरीबी

देवाचा आवडता पदार्थ अन्न कोणते?

प्रत्येकाच्या घरात परंपरागत आलेले कुलस्वामी, कुलदेवी यांचा आवडता नैवेद्य कोणता याची माहिती तुम्हाला असायला हवी. तेच रोजचा नैवेद्य दाखवताना त्यांना आवडत नसलेला पदार्थ कधीही अर्पण करू नका. जर घरी काहीच देवाच्या आवडीचे बनलेले नसेल तेव्हा तुम्ही बाहेरील लाडू, बर्फी असे पदार्थ नैवेद्यात ठेऊ शकता.

हे नसेल तरी तुम्ही शुद्ध भावनेने दिलेली साखरही देवाला गोड लागते. त्यामुळे तुम्ही मनात श्रद्धा ठेवा अन् देवाची पूजा करा. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही.

देवाला नैवेद्य दाखवता ती भांडी कशाची आहेत?

मनुष्याने आजवर चालत आलेली प्रथा पाळून आपले पुर्वज ज्यातून देवाला नैवेद्य द्यायचे तीच प्रथा तुम्ही सुरू ठेवा. देवाला कधीच लोखंड, स्टील किंवा काचेच्या पात्रात नैवेद्य दाखवू नका. आपले पुर्वज, राजे महाराजांच्या काळात ग्रामदैवत, कुलस्वामीला सोन्या, चांदीच्या ताटात शक्य नसेल तर तांब्या पितळेच्या पात्रात नैवेद्य द्यायचे.

तसेच, तुम्हीही सोन्या, चांदीच्या भांड्यात नैवेद्य दाखवा. पुर्वी लोक तांब्या, पितळेची भांडी जेवणासाठी वापरायची. त्याच ताटात ते देवाला नैवेद्य द्यायचे तुम्हीही असे करू शकता.

जसे देवाच्या पुजेसाठी लागणारी भांडी, पळी पंचपात्र, ताम्हण, कलश हे तांब्याच्या धातूच असतं. तसंच, देवासाठीही तुम्ही नैवेद्याचं पात्र तांब्या, पितळेचं वापरावं. (Vastu Tips)

Vastu Tips
Diwali Recipes 2022: धनत्रयोदशी निमित्त नैवेद्य म्हणून बनवा सगळ्यांना आवडणारी आणि करायलाही सोप्पी अशी काजूकतली.

देवाला नैवेद्य कसा अर्पण करावा?

आपल्याकडे मार्गशिर्ष महिन्यातील दर गुरूवारची पूजा तुम्ही अनेकवेळा ऐकली असेल. त्यात शामबालाची कथा तुम्हाला पाठही असेल. त्यात ती पूजा कशी करावी, त्याने काय फळ मिळतं आणि देवाला नैवेद्य कसा दाखवावा याचा उल्लेख आहे.

कोणत्याही पूजेला बसताना, नैवेद्य दाखवताना तुमचं मन सात्विक असावं असं त्यात म्हटलं आहे. तसेच, तुम्ही जे काही देवाला अर्पण कराल ते अन्न शुद्ध असावं. तसेच तुम्ही सायंकाळी नैवेद्य दाखवत असाल तर बाहेरून आल्यानंतर आधी स्वच्छ हातपाय धुवावेत आणि मगच देवाला नैवेद्य दाखवावा.

देवाचा नैवेद्यात कांदा, लसूण असे पदार्थ नसलेला असावा, हे लक्षात ठेवा. काही घरात जे बनवलं तेच नैवेद्यात ठेवलं जातं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कांदा लसणात असलेला तामसिक गुणधर्म देवाला अर्पण करू नये. (Astrology)

Vastu Tips
बाप्पाला ‘बीज’मोदकाचा नैवेद्य

देवाच्या नैवेद्याचं नंतर काय करावं?

देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर काही लोक तो तसाच ठेवतात. ही खूप मोठी चूक आहे. देवाला दाखवलेला प्रसाद, नैवेद्य दाखवून तो प्रसाद घरातल्या लोकांनी ग्रहण करण्यास शास्त्र सागंते. तो नैवेद्य तसाच ठेवलात तर अन्नाचा अपमान होईल. तो नैवेद्य खराब होईल अन् सकाळी फेकून द्यावा लागेल. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतील.

एखाद्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाता. तेव्हा तिथे दिलेला प्रसादही तुम्ही मंदिरातच ग्रहण करावा. घरी आणे पर्यंत तो प्रसाद कुठेतरी सांडतो किंवा खराब होतो. त्यामुळे देवळात दिलेला प्रसाद तिथेच ग्रहण करा. तसेच घरातील देवाला दाखवलेला नैवेद्यही तुम्ही ग्रहण करा.

आठवड्यातून एकदा गाय, कुत्र्याला नैवेद्य द्या

पुर्वी आपल्याकडे शेती होती, त्यामुळे शेतासाठी घरोघरी जनावरे असायची. घरोघरी त्या मुक्या प्राण्यांनाही नैवेद्य चारला जायचा. आताही तुम्हाला हे शक्य असेल तर नक्की करा. कारण, जितके पवित्र तुमच्या देवघरातील देव आहेत. तितकेच पवित्र ते प्राणीही आहेत. हिंदू धर्मात तर गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

श्रावणात तर हमखास सोमवारचा उपवा सोडताना घरी गोडाधोडाचं जेवण असतं. तेव्हा त्यातीत एखादा घास गायीला नक्की भरवा. ती लाखमोलाचा आशिर्वाद तुम्हाला देईल. (Lord Shiva)

Vastu Tips
Satara News : 'या' स्मशानभूमीत कावळे नव्हे, तर वानरे शिवतात नैवेद्य; कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

एखाद्याला पोटभर जेवायला घाला

तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरीबाच्या हातावर पाणी घाला. म्हणजेच, देवळाच्या बाहेर बसलेल्या तुमच्याकडून फक्त पोटभर जेवणाची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीला नक्की पोटभर जेवायला घाला. त्या व्यक्तीचा आशिर्वाद नक्की मिळेल. (Shravan 2023)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com