दंगलखोरांनी युवकाच्या डोक्यात खुपसलं ड्रिलमशीन, पाहा थरारक फोटो

19 year old Vivek attacked in his own shop drill machine bored into his head
19 year old Vivek attacked in his own shop drill machine bored into his head
Updated on

नवी दिल्ली : दोन दिवसापासून दिल्ली धगधगत असून सीएए हिंसाचारात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान एका 19 वर्षीय युवकाच्या दुकानावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात ड्रिलमशीन खुपसण्यात आलं आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.

दिल्लीतील हिंसाचारामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या युवकाच्या एक्स-रेचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. युवकाच्या डोक्यात हे ड्रिलमशीन इतक्या जोरात घुसलं आहे की त्याच्या कवटीला भेदून आत गेल्याचं एक्स-रेमधील फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो थरारक आहे.

इंदूरीकरांच्या किर्तनाला गेल्या अन्...

दुकानात उपस्थित असलेल्यांनी या तरुणाला तातडीनं जीटीबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या तरुणाच्या टेस्ट करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी शस्त्रक्रिया करून या तरुणाच्या डोक्यातून ड्रिलमशीनचा तुकडा काढण्यात आला आहे. तर डॉक्टरांनी रिपोर्टवरून दिलेल्या माहितीनुसार दंगलखोरांनी त्या तरुणाच्या डोक्यातच ड्रिलमशीन घातलं असावं, असं एक्स रे च्या रिपोर्टमध्ये दिसत असल्याचं म्हटलं आहे.

तत्पूर्वी, दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीमध्ये सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com